मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने दाखल केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आज निकाल लागणार आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी गेल्या दहा महिन्यापासून कोर्टात युक्तिवाद केला आहे. त्यामुळे हा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे. त्याआधी न्यायालय आज दोन निकाल देणार आहेत.
हेही वाचा…महानिकाल…! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल..,! राजकारण तापणार, सरकार कोसळणार ?
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल आज ११.३० वाजता लागण्याची शक्यता आहे. त्याआधी माजी चीफ जस्टीस अहमदी यांच्या निधानामुळे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. ती पार पडल्यानंतर कोर्टाकडून दिल्ली सरकार विरूद्ध उपराज्यपाल या प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या निकाल दिला जाणार आहे.
हेही वाचा…“160 कोटीचं काम 263 कोटी रूपयाला”, तीन ‘भ्रष्टाचाराची फाईल्स’ घेऊन आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता आहे. फक्त सरन्यायाधीश वाचून दाखवणार आहेत. दोन वेगळ्या निकालांची किंवा घटनापीठात मतभेदांची शक्यता खुप कमी आहे. थोड्याच वेळात सरन्यायाधीश चंद्रचुड महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालचं वाचन सुरू होणार आहे. त्यामुळे याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
हेही वाचा…“आम्ही सर्व कायदेशीर केलंय, निकालाकडे आम्ही आशादायी,” राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या पाच घटनापीठात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमुर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमुर्ती हिमा कोहली आणि न्यायमुर्ती पीएस नरसिम्हां यांचा समावेश आहे. या खंडपीठातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एमआर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. “
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, अन् तेच आमचे नेते,” निकालाआधी फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…राष्ट्रवादीचे खासदार डॉ. कोल्हे यांची महापालिका भेट; पण पदाधिकाऱ्यांविनाच! शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा
हेही वाचा…..महाराष्ट्र सत्तासंघर्ष निकाल..! निकालानंतर काय होऊ शकतं, काय घडू शकतं? वाचा सविस्तर
हेही वाचा…“आगामी लोकसभा निवडणुक कोणत्या पक्षाकडून लढायची?” अमोल कोल्हेंनी दिले मोठे संकेत