पुणे : अजित पवार गटात येण्यासाठी अनिल देशमुख मंत्रीपद मागत होते, परंतु भाजपने त्यांना नाकारल्याने त्यांना मंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आले. असं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यावर आता माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार गटाची पुण्यात बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.
हेही वाचा…“स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा”, आव्हाडांच्या ‘या’ टिकेला अजित पवार गटाचं उत्तर
ज्या भारतीय जनता पक्षाने मला खोट्या प्रकरणात मला फसवलं. त्या पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्यासोबत जाण्यासाठी हवं ते खातं देण्याची त्यांची तयारी होती. ज्यांनी मला फसवलं त्यांच्यासोबत मला जायचं नव्हतं. मी भाजपसोबत यावं यासाठी माझ्या घरी हसन मुश्रीफ पाच तास बसून होते. मला पाहिजे ते मंत्रीपद द्यायला सुद्धा तयार होते. मात्र मी कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे अजित पवारांना सांगितले असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं.
हेही वाचा…ठरलं तर मग..! शरद पवार गट लोकसभेच्या बारामतीसह ‘या’ पंधरा ते सोळा जागा लढविणार
दरम्यान, भाजपसोबत जायला नको ही स्पष्ट भूमिका होती. मला आनंद परांजपे किंवा जितेंद्र आव्हाडांची मदत घेण्याची गरज नाही. माझी स्वत: ची निर्णय घेण्याची कुवत आहे. लोकांच्या समोर जायचं असेल तर लोक जी भूमिका घेतील ती मान्य करावी लागेल. असं म्हणत शरद पवारांनी यावेळी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! “एकाची गाडी फोडली आता दुसऱ्याच्या घरावर दगडफेक,”जालन्यात मोठा राडा, दोन माजी मंत्री टार्गेटवर
हेही वाचा…राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक, टोपेंनी ‘या’ माजी मंत्र्यांवर केलेत गंभीर आरोप
हेही वाचा…“बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का?”, जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सरकारला सवाल
हेही वाचा…“इडीने मुंबई अन् दिल्लीतलं घर का ताब्यात घेतलं? त्याचाही पुस्तकात उल्लेख करावा,” शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना टोला
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंच उमेदवार, उदय सामंताचं विधान, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये वाढली धाकधूक