IMPIMP
I have everyone's horoscope, do good work for the party, Eknath Shinde's direct warning I have everyone's horoscope, do good work for the party, Eknath Shinde's direct warning

“सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे, तुम्ही पक्षासाठी चांगलं काम करा”, एकनाथ शिंदेंचा थेट इशारा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची नेत्यांची रिग अजूनही थांबलेली नाही. यातच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांच्या सुवर्णा करंजे ह्या अंत्यत निकटवर्तीय मानल्या जातात. वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थित प्रवेश केला आहे. खासदार संजय राऊतांना अटक झाल्यानंतर सुवर्णा करंजे या शिवसेनेच्या विरोधात आक्रमक झालेल्या दिसल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांतच सुवर्णा करंजे यांचा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हेही वाचा…जाहिरात देणारा हितचिंतक कोण, जाहिरातीचे पैसे कुणी दिले? अजित पवारांचा सवाल 

मागील अडीच वर्षात पुर्ण सामाजिक, विकासाची कामकाज बंद होतं. पंरतु आम्ही आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर बाजूला केले. महाराष्ट्रात सगळे प्रकल्प सरू केलेत. राज्यात सर्वसामान्य लोकांचे जेव्हा डोळ्यासमोर ठेवून काम करू लागतो त्यावेळेस मग अशा प्रकारची काम आपल्या हातून होतात. त्यामुळे इतर संपुर्ण राज्यातले नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, लाखो लोक शिवसेनेत येत आहेत. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा…राज्यात फडणवीसांच्या सभांचा सिलसिला सुरू होणार, भाजपने मोठी रणनीती आखली

आपलं सरकार सर्व सामान्य लोकांचं असल्याने जे काही करता येईल ते आपण करतोय. तुम्ही बिंदास काम करा. हा तुमचा मुख्यमंत्री नाही तर एक आपला भाऊ म्हणून तुमच्या पाठिशी आहे. असं म्हणत सुवर्णा कारंजे यांना  सगळ्यांची कुंडली मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही चांगल काम करून संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करा. असं म्हटलं आहे. यातच शिवसेनेचे उपनेतेपद म्हणून आपण याठिकाणी काम करा, पुर्ण पक्ष संघटना आपल्यासोबत आहे. असंही शिंदे म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा…एक साध्या पोलीस ऑफिसरकडे इतकी मालमत्ता कशी? अजित पवारांनी थेट यादीच वाचून दाखवली 

हेही वाचा…उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..! संजय राऊतांच्या निकवर्तीयांनी केला शिंदे गटात प्रवेश 

हेही वाचा…“५० कुठं अन् १०५ कुठं? देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है.!” भाजपने शिंदेंना डिवचलं, महायुतीत मिठाचा खडा 

हेही वाचा…आधी थेट फडणवीसांना आव्हान! आता पुन्हा करणार भाजपमध्ये प्रवेश, आशिष देशमुखांनी काढला मुहूर्त

हेही वाचा…नवनीत राणांच्या विरोधात राष्ट्रवादी ‘हा’ तगडा उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंचाही बदला घेणार ?