मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा अश्लिल व्हिडीओ काही दिवसापुर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत पावसाळी अधिवेशनात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पेन ड्राईव्ह देत चौकशी करण्याची मागणी केली. परंतु सोमय्यांचा व्हिडीओ प्रसारित करण्याऱ्या संपादकांवर गुन्हा दाखल झाला, पण सोमय्यांवर अद्यापही गुन्हा का दाखल झाला नाही. असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय आहे.
हेही वाचा…काहीही करून मुख्यमंत्र्यांच्या मुलाला घरी बसवायचंय, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना, मोठी रणनीति तयार
कोणतीही सखोल चौकशी न करता लोकशाही चॅलन व संपादक कमलेश सुतार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणे धक्कादायक आहे. सुतार यांनी एका भंपक आणि महाराष्ट्र द्वेषाची गरळ सतत ओकणाऱ्या व्यक्तीचा खरा चेहरा उघड केला. पण चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. नागरी स्वातंत्र्यांची चाड असणाऱ्या प्रत्येकाने आता यावर आवाज उठवायला हवा. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा…“जालन्यात मुख्यमंत्र्यांनी उपोषण करायला सांगितले, तर लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिलेत”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील आणखी एक ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांच्यावरही याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. खरंतर हे नागडंउघडं सत्य महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील सर्वच पत्रकारांनी समोर आणलं, युट्युब चॅनलने हे प्रकरण समोर आणलं, वृत्तपत्रांनी त्यावर बातम्या दिल्या. मात्र गुन्हा अनिल थत्ते, कमलेश सुतार आणि त्यांच्या चॅनलवर दाखल होत आहे. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…सभागृहात पेन ड्राईव्ह दिला, ‘त्या’ प्रकरणात संपादकांवर गुन्हा दाखल, पण सोमय्यांवर का नाही ?
दरम्यान, पावसाळी अधिवेशनापुर्वी भाजपनेते किरीट सोमय्या यांचा अश्लिल व्हिडीओ लोकशाही न्यूजने प्रसारित केला होता. त्यानंतर सोमय्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात अंबादास दानवे यांनी विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हेंंकडे पेन ड्राईव्ह देखील देण्यात आला होता. त्याची अद्याप काहीही चौकशी करण्यात आली नाही. परंतु यातच आता लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संपादकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सोमय्यांवर का नाही ? असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.
कोणतीही सखोल चौकशी न करता लोकशाही चॅनल व संपादक कमलेश सुतार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे धक्कादायक आहे. सुतार यांनी एका भंपकआणि महाराष्ट्र द्वेषाची गरळ सतत ओकणारया व्यक्तीचा खरा चेहरा उघड केला.पण चोर सोडून संन्याशाला फासावर लटकविण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे.नागरी… https://t.co/Xkqup1BsXi
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“एका व्यक्तीने सरकारला जेरीस आणले, मनोज जरांगे पाटील गुंडाळले जाऊ शकत नाही”
हेही वाचा…नांदेडमधील काॅंग्रेसचा मोठा नेता शिवसेनेत, अशोक चव्हाणांना बसला मोठा धक्का
हेही वाचा…“शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी वातावरण तयार केलं जातंय”, वकील असीम सरोदे यांचा दावा
हेही वाचा…रिक्षा डंपर भरून माझ्याकडे पुरावे, सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं, जरांगे पाटलांचं विधान
हेही वाचा…“चौकशी लागेल, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं जाईल, पण जनरल डायरचं काय?” आदित्य ठाकरेंचा सवाल