पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येच पक्ष फुटीनंतर यादवी माजल्याचं पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर १५ वर्ष एक हाती असलेली सत्ता आणि शहरात पक्षाच्या वाताहातीला शरद पवार कारणीभूत असल्याची टिका राष्ट्रवादीच्याच आमदारांनी केली आहे. तर या टिकेला उत्तर देतांना शरद पवार गटातल्याच पदाधिकाऱ्यांनी आमदारांना लक्ष केलं असून पिंपरी चिंचमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी सामना रंगला आहे.
हेही वाचा…महायुतीत आता तिन्ही पक्षाची समन्वय समिती, मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार का ?
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसला आलेल्या अपयशावरून अजित पवार गटाने शरद पवार यांच्यावर टिका अपयशाचं खापर फोडलं आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना ‘मुख्यमंत्री’ पद तर एकनाथ शिंदेंना ‘अर्थमंत्री’ पद देऊन तिढा सोडवा”
२०१७ च्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेवर पहिल्यांदाच राष्ट्रवादीनी एक हाती सत्ता मिळवली. त्यानंतर शहरात राष्ट्रवादीला उतरती कळा लागली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा मावळ लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर विधानसभा निवडणुकीत भोसरी आणि चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादीला उमेदवारीही मिळाली नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली. त्यामुळे मला वाटतं की दादांना हे सर्व माहित असल्यामुळे आता राष्ट्रवादीची सत्ता नक्कीच येईल, असं आमदार बनसोडे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आदिती तटकरेंवर शिंदे गटाची टिका, दोन्ही वादात आता मनसेची उडी, म्हणाले, “अशा नेत्यांकडून…”
दरम्यान, शरद पवार साहेबांनी अजित पवार साहेब यांच्याकडे या पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी दिली होती. त्याच्यामुळे 2017 ला जे काय झालं असेल ते 2019 ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काय झालं असेल. याची सर्वस्वी जबाबदारी ही अजित पवार साहेब यांची आहे. असं शरद पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे पिंपरी चिंचवड मधील भाजपने त्याने मौन बाळगणं पसंत केलाय. कारण राष्ट्रवादीतील या यादवी युद्धाचे सल भाजपलाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अजित पवार महायुतीत आल्यामुळे ते पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरावरती आपली पकड मजबूत करणाऱ्या त्यामुळे आगामी काळात भाजप समोर राष्ट्रवादीचा आव्हान उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे अन् भाजपकडील महत्वाची खाती काढली, राष्ट्रवादीच्या वाट्याला खाती
हेही वाचा…“आपण मेहबुबा मुक्तिसोबत गेलो पण, जेव्हा वेळ आली…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
हेही वाचा…“जिथं जिथं अन्याय होईल, तिथे एकनाथ शिंदे जन्म घेईन, अजित पवार… “, फडणवीसांचं मित्र पक्षांबाबत सुचक वक्तव्य
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, फडणवीसांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं, सगळा किस्सा सांगितला
हेही वाचा…“विधानसभेत २०० तर लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागा महायुती जिंकणार “