विरेश आंधळकर, पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून काल करण्यात आलेली जाहिरात बाजी आता त्यांच्याच अंगलट आल्याच दिसत आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून राष्ट्रात नरेंद्र मोदी तर राज्यात एकनाथ शिंदे असा नारा देण्यात आला, दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना फडणवीसांपेक्षा जास्त पसंती असल्याचा दावा देखील जाहिरातीद्वारे करण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण झाल्यानंतर आता शिवसेनेकडून आज नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा…मोदींना जिंकवण्यासाठी भाजप ‘ह्या’ खासदारांचे तिकीट कापणार, बड्या नेत्याचं वक्तव्य
आज वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकला आहे. तर काल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देखील नसल्याने विरोधकांनी शिंदेंना टार्गेट केलं होतं. आज बाळासाहेबांसह धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारची कामगिरी तसेच युती सरकारवर लोकांचा कसा विश्वास आहे, याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला छ.संभाजीनगरचे वावडे..! औरंगाबादचं नामांतराचा पडला विसर
कालच्या जाहिरातीमध्ये नेमकं काय होत?
राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे” असा नारा देणारी ही जाहिरात होती, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीसांना 23.2 टक्के लोकांची पसंती असल्याच सांगण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळाल्याचा दावा देखील जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आला होता. ही जाहिरात सध्या चांगलीच चर्चेत आलीय. एकनाथ शिंदेंना सरस ठरवताना मात्र राज्यातील भाजपचे सर्वोच्च नेतृत्व असणाऱ्या फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होत.
READ ALSO :
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी महेश लांडगे लागले कामाला..! ओझरमध्ये “श्री गणेशा”, सोबतीला भाजपची फौज
हेही वाचा…“महाराष्ट्रातच नाही तर या राज्यांतही मित्रपक्षांचं भाजपसोबत बिनसलं” मोदींना मोठा धक्का बसण्याची शक्यता
हेही वाचा…“कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा शिंदेंचा पहिलाच पक्ष”,सुप्रिया सुळेंनी उडवली शिंदेंची खिल्ली
हेही वाचा…“शिवसेना आमचीच दावा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वगळला, हा त्यांचा अपमान नाही का ?” अजित पवारांचा सवाल
हेही वाचा…राज्यात आज निवडणुका झाल्यास काय होणार ? सर्वात मोठा एक्झिट पोल आला पुढे, शिंदेंचं काय होणार?