तासगाव : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाशी संबंधित परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना इडीने समन्स बजावून चौकशीसाठी बाेलावले आहे. दरम्यान, त्यांच्या तासगाव मधल्या वंजारवाडी इथे बांधलेल्या फार्म हाऊसची पाहणी करण्यासाठी सोमवारी किरीट सोमय्या आले असताना त्यांनी, “माझ्या माहितीप्रमाणे ईडीकडे खरमाटे यांच्या ७५० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आहे. आता लवकरच अनिल परब यांचेही काऊंटडाऊन सुरु,” असा सूचक इशारा दिला आहे.
पडळकर खऱ्या बापाची औलाद असतील तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, वडेट्टीवारांचे आव्हान
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेच्या माध्यमातून आणि माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी मालमत्ता गोळा केली आहे. सांगलीतच ४ ठिकाणी खरमाटे यांची अनधिकृत मालमत्ता आहे. एकेठिकाणी १५० एकर जमीन आहे. MIDC मध्ये ५ एकर जागेवर कंपनी आहे. वंजारवाडीत अलिशान फार्म हाऊस आहे, हे अधिकारी कसे कमवू शकतो?” असा सवाल त्यांनी केला आहे.
Tomorrow at Sangli, I am visiting Properties & BENAMI Properties of Anil Parab's Secratary Bajarang Kharmate
1. Tasgaon Farm House
2. Cement Pipes Factory
Chikhalhol3. Bedug 150 Acre Land
4. Kupwad MIDC 5 Acre Land @BJP4India
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 5, 2021
“मलाही तुमच्यातला दम पाहायचंय,” चित्रा वाघ यांनी स्वीकारलं मेहबूब शेख यांचं आव्हान
तसेच, “खरमाटे हे परबांचे सचिव आहेत. त्यामुळे, त्यांची बेनामी संपत्ती ही परबांची बेनामी संपत्ती असण्याचा दाट संशय आहे. त्यामुळे, या सगळ्याची ईडी, सीबीआय आणि लाचलुचपत विभागाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी मी सरकारकडे करणार आहे,” असं म्हणत, “ठाकरे सरकारचा एक अनिल आता जेलच्या दरवाजात उभा आहे, तर दुसरा जेलमध्ये जाण्याचा मुहूर्त शोधतोय. आता दोन्ही अनिल लवकरच जेलमध्ये जाणार आहेत,” असा दावा त्यांनी केला आहे.
तासगाव सांगली, येथील बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी केली. खरमाटे चा आणखी ४ बेनामी मिळकत सांगली येथे आहे.
अनिल परबचे सहाय्यक खरमाटे यांच्याकडे सांगली, पुणे, बारामती, मुंबई येथे 40 हून अधिक अधिकृत/बेनामी मिळकत (properties) आहेत.@BJP4Maharashtra pic.twitter.com/5YM3XWgKyu— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 6, 2021
“…अन्यथा संजय राऊतांना पुण्यात फिरुही देणार नाही,” भाजपचा आक्रमक पवित्रा
दुसरीकडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्यवर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या गंभीर आरोपानंतर, त्यांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी केली जात आहे. यातच काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने समन्स रद्द करण्याच्या देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यांनतर, आता उच्च न्यायालयानेही यावर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. तसेच, देशमुखांच्या वकिलाला सीबीआयने ताब्यात घेतले असून, त्यांना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Read Also :
- ब्रेकिंग! करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- बेळगाव महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय; राज्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसणार?
- करुणा शर्मा यांना अडकवण्यासाठी रचले गेले षडयंत्र? नवी माहिती समोर
- चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यात रंगले सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध
- संजय राऊत तोंडघशी पडले, बेळगांव महानगरपालिकेवर भाजपची मुसंडी, स्पष्ट बहुमत