– भाजपाच्या दोन्ही आमदारांना आव्हान देण्यासाठी बहल मैदानात
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवडमधील ‘मॅनेजमेंट गुरू’माजी महापौर योगेश बहल हेच २०२२ च्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर ‘बॉस’आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीच्या शहर संघटनेत आता बदल करण्यात येणार असून, शहराध्यक्ष, महिलाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अशा तीनही पदांवर बहल यांच्या नियंत्रणाखाली निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर राष्ट्रवादीचा ‘रिमोट कंट्रोल’पिंपरी मतदार संघातून बहलांच्या हातात राहणार आहे.
अटक करुन जेलमध्ये टाका, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आमदार रवी राणांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे २०वर्षे सत्ता गाजवली. स्थानिक आणि बाहेरचा असा पक्षांतर्गत वाद असतानाही राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी योगेश बहल यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कंट्रोल’ठेवला. राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ अजित पवार यांचा बहलांवर प्रचंड विश्वास पूर्वीपासून आहे. त्यामुळे शहराध्यक्ष, स्थायी समिती सभापती, महापौर अशी महत्त्वाची पदे बहलांच्या वाट्याला आली. किंबहुना, एकेकाळी भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदार संघाचा उमेदवारही योगेश बहल ठरवतात.
जोशुआ हे वडिलांप्रमाणेच देश, राज्याचा प्रथम विचार करणारे; आरएसएस डिसुझाच्या पाठीमागे ठामपणे उभा
२००९ मध्ये माजी आमदार विलास लांडे सक्षम उमेदवार असतानाही योगेश बहल यांनी आपल्या समर्थक माजी महापौर मंगला कदम यांच्यासाठी तिकीट खेचून आणले होते. किंबहुना, पिंपरी-चिंचवडमधील स्थानिकांना अत्यंत प्रोफेशनलपद्धतीने दोन हात करणारा हक्काचा ‘सिंगल पाईंट कनेक्ट’म्हणून योगेश बहल यांनी अजित पवार यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत.
” तू योद्धा महान है ” नितेश राणेंच्या मुंबईतील बॅनरने शिवसेनेला पुन्हा डिवचले
वास्तविक, स्थानिक आणि बाहेरचा वादाचे मूळच योगेश बहल यांना लीडरशीप दिल्यापासून सुरू झाले. राष्ट्रवादी केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना योगेश बहल शहरातील ‘डिसिझन मेकर’ होते. यागेश बहल यांनी शहर संघटनेतील पद सोडल्यानंतर विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्याकडे धुरा सोपवण्यात आली. भाजपाच्या लाटेत राष्ट्रवादीच्या अनेकांनी भाजपात प्रवेश केला. परिणामी, महापालिकेतील सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली.
यापुढे सिंधुदुर्गात दहशत चालणार नाही; वैभव नाईकांचा राणेंना कडक शब्दात इशारा
राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्त्वाला पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी पक्ष संघटनेत बदल करण्याचा विचार पुढे आला. राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला. प्रारुप प्रभाग रचनेपासून शहर संघटनेत बदल करण्यापर्यंत योगेश बहल यांना विश्वासात घेण्यात आले. किंबहुना, शहराध्यक्षपदी योगेश बहल यांनी पुन्हा जबाबदारी घ्यावी, असे पाचारणही करण्यात आले होते. मात्र, स्थानिक आणि बाहेरचा वाद पुन्हा उफाळून येवू नये. यासाठी सावध भूमिका घेण्यात आली. ज्येष्ठांच्या फळीतील नेत्यांना शहराची धुरा दिली असती, तर बहल यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवता आले नसते. त्यामुळेच नव्या फळीतील आणि बहलांच्या शब्दाबाहेर न जाणाऱ्या लोकांना संघटनेत जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अजित गव्हाणेंच्या रथाचा सारथी योगेश बहलच…
भाजपाला पर्यायाने दोन्ही स्थानिक आमदारांना आव्हान देण्यासाठी जातीय समीकरणे आखण्यात आली. शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांना संधी देण्यात येणार आहे. अजित गव्हाणे यांना २०२४ मध्ये विधानसभा लढवायची आहे. त्यांचा रथाचा सारथी योगेश बहल हेच आहेत. कारण, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणायची असेल, तर जातीय समीकरणे यशस्वी केली पाहिजते. यासाठी स्थानिक आणि मराठा समाजातून अजित गव्हाणे, माळी समाजातून कविता आल्हाट, पिंपरीत मागास समाजाचा चेहरा म्हणून राहूल भोसले, व्यापारी आणि अस्थानिक चेहरा म्हणून जगदीश शेट्टी, चिंचवडमधून स्थानिक चेहरा म्हणून प्रशांत शितोळे अशा लोकांना पक्षसंघटनेत संधी देण्याचा मोठा निर्णय राष्ट्रवादी घेणार आहे. तसेच, अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी म्हणून निहाल पानसरे यांना युवकाध्यक्षपदी संधी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. हे सर्व समीकरण आणि सूत्र माजी महापौर योगेश बहल यांनीच मांडले असून, त्याद्वारे शहर संघटनेचा ‘रिमोट कंट्रोल’ बहल आपल्या हातात ठेवणार आहेत. विशेष म्हणजे, स्थानिक पक्षश्रेष्ठी आणि अजित गव्हाणे यांच्यात असलेले समज-गैरसमज योगेश बहलांच्या मध्यस्थीने थेट अजित पवार यांच्या समक्ष दूर करण्यात आले आहेत, असे सांगितले जाते.
प्रभाग रचनेवर बहलांचे प्राबल्य…
सत्ताधारी भाजपातील नाराज नगरसेवक योगेश बहल यांच्या संपर्कात आहेत. बहलांच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडे ‘फिल्डिंग’चा अनेकांचा प्रयत्न आहे. स्वपक्षातील विरोधकांसह भाजपाच्या दोन्ही आमदारांचा ‘करेक्ट कार्यक्रम’करण्यासाठी योगेश बहल कामाला लागले आहेत. त्यासाठी काही ज्येष्ठ पत्रकार आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांना हाताशी धरुन मोर्चबांधणी करण्यात आली आहे. वास्तविक, योगेश बहल यांना आता आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. परंतु, शहरातील तीनही मतदार संघातून त्यांना आमदारकीचा प्रवास सोपा नाही. त्यामुळे विधान परिषदेवर संधी मिळावी. यासाठी बहलमहापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी ‘रिझल्ट’ देण्याच्या तयारीत आहेत. किंबहुना, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी भाजपा दोन्ही आमदार तोडीस-तोड दोन हात करणारा ‘कॉर्पोरेट चेहरा’म्हणून बहल यांना ताकद देण्यात येत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापलिकेत राष्ट्रवादीची सत्ता आल्यास त्याचे शिल्पकार योगेश बहल राहतील, असे राजकीय चित्र आहे.
संघटनात्मक त्रिसूत्रीचे जनक योगेश बहल…
भाजपातील नाराज नगरसेवकांचे राष्ट्रवादीत होणारे प्रवेश केवळ नव्या कार्यकारिणीच्या घोषणेच्या प्रतीक्षेत थांबवले आहेत. प्रभाग रचना करताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. प्रभाग रचनेची स्थानिक धुरा योगेश बहल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. या प्रभाग रचनेत गावकी-भावकीचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला. विशेष म्हणजे, स्वपक्षीय विरोधकांसह भाजपा आणि शिवसेनेतील मातब्बरांची गोची करण्यात योगेश बहल यशस्वी झाले आहेत. २०२४ मध्ये आपल्या विचारांचे आमदार शहरातील तीनही मतदार संघात असावेत आणि शहराची लीडरशीप आपल्या मुठीत ठेवण्यासाठी २०२२ मधील पायाभरणी करण्यात योगेश बहल यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सत्तेच्या समीकरणात स्थानिकांना ‘कात्रजचा घाट’दाखवला जातोय का? असा प्रश्न निमित्ताने उपस्थित झाला आहे. लोकशाही व्यवस्थेत स्थानिक आणि बाहेरचा असा मुद्दा महत्त्वाचा नसला, तरी स्थानिकांना टार्गेट करणे, हेसुद्धा असंवैधानिकच आहे, हे विसरता कामा नये.
Read also:
- ….तोवर मास्क लावायचा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं कधीपर्यंत मास्क घालावा लागणार
- किरीट सोमय्यांच्या सत्काराला महापालिकेने परवानगी नाकारली; भाजप सत्कार करण्यावर ठाम
- संजय राऊत मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर; आशिष शेलारांची राऊतांवर बोचरी टीका
- मोठी बातमी: बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण…
- लढा एसटी विलिनीकरणाचा; अहवाल सादर करण्यास आठवडाभर मुदवाढ