नवी दिल्ली : काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना आज सक्तवसुली संचालनायानं समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी त्यांना इडीकडून समन्स बाजवण्यात आले आहे. तसेच ८ जून रोजी त्यांना इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. या प्रकरणाची फाईल्स इडीने २०१५ मध्ये बंद केली होती. मात्र आता ईडीने समन्स पाठवले आहे. त्यावर आता काॅंग्रेसची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
“खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला
काॅंग्रेस ब्रिटिश राजवटीच्या अत्याचाराला घाबरली नाही. तर इडीच्या नोटीसने सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि काॅंग्रेस पक्षाचे धैर्य कसे मोडू शकते. आम्ही लढू, आम्ही जिंकू आम्ही झूकणार नाही. घाबरणार नाही. असं काॅंग्रेसने ट्विटवर म्हटलं आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?
सुब्रमण्याम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी, तसेच दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले. आणि काॅंग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रूपयांपर्यतची मालमत्ता जप्त केली असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.
“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
या प्रकरणाचा तपास इडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसुन ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असं प्रकरणावर काॅंग्रसेचं म्हणणं आहे. तसेच काॅंग्रेसने नॅशनल हेराल्डला ९० कोटींचे कर्ज दिले होते. द असोसिएटेड जर्नल ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.
Read also:
- शरद पवारांवरील टिका भोवली; कर्जतमध्ये गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल
- “केंद्र सरकारने राज्याला 14 कोटी दिलेत, आता इंधनावरील दर कमी करावा”; भाजप नेत्याची मागणी
- “विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
- “मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
- “हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले