IMPIMP

महाराष्ट्रातील या 6 व्यक्तींना प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 119 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यापैकी 6 महाराष्ट्रातील आहेत.

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये रजनीकांत देविदास श्रॉफ – पद्मभूषण (व्यापार), सिंधुताई सपकाळ – पद्मश्री (सामाजिक काम), जसवंतीबेन जमनादास पोपट – पद्मश्री (व्यापार आणि व्यवसाय), परशुराम आत्माराम गंगावणे – पद्मश्री (कला), नामेदव सी. कांबळे – पद्मश्री (शिक्षण आणि साहित्य) आणि गिरिश प्रभुणे – पद्मश्री (सामाजिक काम) यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने एकूण 102 जणांना पद्मश्री, 7 जणांना पद्मविभूषण आणि 10 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. यात काही परदेशी नागरिक आणि मरणोत्तर पुरस्कारांचा देखील समावेश आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील अनिल दशरथ खुले आणि बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना ‘जीवन रक्षा पदक’, तर परमेश्वर बालाजी नागरगोजे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच, हवालदार सर्वश्री उत्तम विश्वनाथ गावडे, संतोष बबला मंचेकर आणि बबन नामदेव खंदारे या महाराष्ट्रातील तिघांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘सुधारात्मक सेवा पदक’ जाहीर झाले आहे.

Read Also :