नवी दिल्ली : अलिकडेच झालेल्या ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. नागालँडमध्ये BJP-NDPP आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षानं नागालँडमध्ये सरकार स्थापन केलं आहे. तर राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले असून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यावरून आता विधानभवनात यावरून मोठा गदारोळ बघायला मिळाला.
हेही वाचा…शरद पवारांनी दिला भाजपला बिनशर्त पाठिंबा, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच..असं काही घडलं की..
नागालॅंडमध्ये आमचा एक राष्ट्रीय पक्ष राष्ट्रवादीने भाजपच्या फक्त मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. बदलाचे वारे कसे फिरलेत. मला वाटतंंय. नागालॅंडमध्येही पन्नास खोके एकदम ओक्के झालंय का? असा खोचक टोमना सभागृहात शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीला हाणला. एकाबाजूला जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे अन् दुसऱ्या बाजूला मांडीला मांडी लावून बसायचं. पन्नास खोके अन् एकदम ओक्के, नागालॅंड ओक्के असं म्हणत गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादीला डिवचलं.
हेही वाचा…महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल फडणवीसांकडून सादर,उद्या अर्थसंकल्प सादर होणार
गुलाबराव पाटलांच्या टिकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. आज राज्य सरकार, केंद्र सरकार सगळ्या तपास यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. मग त्याची चौकशी करा ना. ही कुठली तुम्ही पद्धत आहे. असा सवाल करीत कारण नसतांना बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ईशान्य कडील राज्यांमध्ये सर्वपक्षीय मिळून सरकार स्थापन करण्याची त्यांची परंपरा आहे. त्यामुळे त्याची चर्चा इथं करणे अयोग्य आहे. असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा..“राष्ट्रवादीच्या नाराजीचा फायदा घेत भाजपने बाजी मारली, अवघ्या एका मताने सत्ता खेचून आणली”
दरम्यान, या गोंधळात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांनी देखील उडी घेतली. त्यानंतर त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर भाष्य केलं. त्यावेळी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला.
Read also
- हेही वाचा…“राज साहेब अतिशय दिलदार मनाचा राजा माणूस”, जुने ऋणानुबंध जुळले, धंगेकरांची प्रतिक्रिया
- हेही वाचा…“दाढी अन् मिशा आल्या म्हणजे अक्कल येते, असं काही नाही”
- हेही वाचा..भुजबळांनी शिंदेंना डिवचलं, एकनाथ शिंदेंनी अॅक्शन करत दिलं उत्तर, सभागृहात मोठा गोंधळ
- हेही वाचा..अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ, विधानभवनात आता आवाज घुमणार
- हेही वाचा..“कसब्याच्या विजयानंतर पुण्यातील ३ मतदारसंघ डेंजरझोनमध्ये, भाजपची धाकधुक वाढली”