IMPIMP
Political movement increased over Salim Kutta case; The problems of the leader of the Thackeray group increased Political movement increased over Salim Kutta case; The problems of the leader of the Thackeray group increased

सलीम कुत्ता प्रकरणाबाबत राजकीय हालचाली वाढल्या ; ठाकरे गटातील नेत्याच्या अडचणी वाढल्या

नाशिक : हिवाळी अधिवेशनात १९९३ बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे पार्टी करत असल्याचा फोटो भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी सुधाकर बडगुजर यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता या प्रकरणाबाबत मोठी राजकीय घडामोडी सुरू झाली आहे.

हेही वाचा…“बिनडोक, दुरदृष्टी नसलेला व्यक्तीच्या दबावापोटी लोकांच्या भविष्याशी खेळणे सरकारला शोभते का?” रोहित पवारांचा रोख कुणाकडे ? 

भाजप नेत्याने याप्रकरणाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने आता राजकीय हालचाली वाढल्या आहेत. नाशिक पोलीस समील कुत्ताचा जबाब घेणार आहेत. नाशिक पोलिसांचे पथक लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार आहे. १९९३ बॉम्ब स्फोटातील आरोपी समील कुत्ता सध्या येरवडा जेलमध्ये आहे. सलीम कुत्तीची कसून चौकशी होणार आहे. नाशिकमध्ये झालेल्या कथीत पार्टी प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची चौकशी सध्या सुरू आहे. बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या संबंधाची चौकशी होणार आहे. नाशिक पोलिसांचे पथक लवकरच येरवडा कारागृहात जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…एैसा कैसा चलेगा टोमणेसम्राट??? धारावीच्या मोर्चावरून शिंदे गटाने ठाकरेंना डिवचलं

दरम्यान,  सलीम कुत्ता याचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख असून तो १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. त्यावेळी कोर्टाने सलीम कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सुप्रिम कोर्टाने २०१३ साली ही शिक्षा वैध ठरवली. मोहम्मद शेख उर्फ सलीम कुत्तावर स्फोटात वापरलेले साहित्य पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बॉम्बस्फोटातील महत्वाचा आरोपी मोहम्मद डोसा याच्याशी मोहम्मद शेख उर्फ सलीम कुत्ताशी जवळीक आहे. मोहम्मद डोसा याच्याशी संपर्क ठेऊन शस्त्रसाठा पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.  गुजरातमधून हा शस्त्रपुरवठा जमा करून तो महाराष्ट्रात आणण्यात आला होता, हाच साठा स्फोटांसाठी वापरला गेलाय . सलीम कुत्तावर रायगडच्या शेखाडी किनाऱ्यावर उतरवलेले आरडीएक्स पुरवल्याचाही आरोप आहे.

READ ALSO :

हेही वाचा…विधानसभा निवडणुकांच्या पराभवानंतर काॅंग्रेस पुन्हा कामाला लागली, दिल्लीत २१ तारखेला महत्वाची बैठक 

हेही वाचा…“शिवसेनेचा वाघ येतोय..,”अदानी विरोधातील मोर्चातील मागण्या कोणत्या ? 

हेही वाचाठाकरेंच्या मोर्चासाठी जालन्यातील युवक पेटती मशाल घेऊन मुंबई दाखल, मोर्चाला थोड्याच वेळात होणार सुरूवात 

हेही वाचाहॉर्स रायडिंग मैदानाची ‘रेस’ : ते आले…त्यांनी भेट दिली…जिंकून गेले सारे! खासदार अमोल कोल्हे यांना ‘राजकीय मायलेज’

हेही वाचा...राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष, असे आजपर्यंत कुणी हिणवलं ? फडणवीसांना शरद पवार गटाचा तिखट सवाल