मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे भाजपने मुंबईतील कार्यालयात मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. मात्र देवेंद्र फडणवीस याठिकाणी कार्यक्रमाला गैरहजर होते. त्यावरून काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब असं म्हणत चांगलाच टोला लगावला आहे.
“पहिल्या दिवसापासून सरकार पडेल, असं कोणतही वक्तव्य करणार नाही”
बुधावारी पत्रकार परिषदे घेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील तर या मंत्रिमंडळात राहणार नसल्याचं देवेंंद्र फडणवीसांनी म्हटलं होते. शपथविधी होण्याच्या अगोदर भाजपचे अध्यक्ष जे. पी नड्डा आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात राहण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात कोणतीही विकासाची कामे केली नाहीत. राज्याच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचारामुळे तुरूंगात आहेत. ही आश्चर्याची आणि खेदजनक बाब होती. एकीकडे बाळासाहेबांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्री तुरूंगात जातो त्याला मंत्रीपदावरून काढलं नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
एकनाथ शिंदे यांनी केलेलं शिवसेनेतील बंड हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं बंड होतं. त्यानंतर जवळपास 9 दिवस राज्यात मोठ्या राजकीय वादळी घटना घडल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेंना फटकारत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करून सगळ्यानांच धक्कातंत्र दिलं. त्याचबरोबर मंत्रिमंडळात आपण राहणार नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात एक नवी राजकीय खेळी खेळल्याचं बोलण्यात येत आहे.
मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब. #BJP
— Prithviraj Chavan (@prithvrj) July 1, 2022
Read also
- शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेस; अब्दुल सत्तार, भुमरें अन् संजय शिरसाठ यांच्यात वाद
- “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही”, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
- “ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
- सातारा जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी; एकनाथ शिंदे सातारा जिल्हातील 4 थे मुख्यमंत्री
- शिंदे सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षांसाठी केसरकर, विखेपाटील चर्चेत; उद्या अधिवेशन