सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर सम्राट म्हणून उदयास आलेले पंढरपूरचे अभिजीत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत पाटील यांचा प्रवेश झाला.
हेही वाचा…“महाविकास आघाडी फुटायला सुरूवात, राष्ट्रवादीमध्ये अधिक जास्त….”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
एका बाजूला पाटील यांची भाजप नेते प्रवीण दरेकर तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक दिसत असताना अचानक झालेल्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठा दावा केला आहे.
हेही वाचा…‘भाजप’ही लवकरच भाकरी फिरवण्याच्या तयारीत, कार्यकारिणीची बैठकीनंतर…
“अभिजीत पाटील हे राष्ट्रवादीमध्ये काम करणार नाहीत. शरद पवारांच्या कार्यक्रमा वेळी अचानक त्यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली गेली, त्यामुळे एवढ्या ज्येष्ठ नेत्याचा अवमान होऊ नये, यासाठी त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा…शरद पवारांची ‘रणनीती’ ठरली, राष्ट्रवादीची मोठी फौज मैदानात, संपुर्ण महाराष्ट्र काबीज करणार ?
मात्र ते पक्षाचं काम करणार नाहीत. असं त्यांनी मला सांगितलं आहे, असा दावा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. पुण्यामध्ये आयोजित भाजपच्या राज्य कार्यकारणी बैठकीवेळी ते माध्यमांशी बोलत होते.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीकरीता ‘नवनीत राणां’च्या विरोधात ठाकरेंची रणनीती, ‘फायर ब्रॅंन्ड’ नेत्याच्या नावाची चर्चा
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित ! भाजपआमदार महेश लांडगे यांच्या भावना
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना केलेल्या कायद्याला यश,” बैलगाडा शर्यतीवरील कोर्टाने बंदी उठवली, फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“राज्यात पुन्हा ‘भिररर’ चा थरार रंगणार, कोर्टाने ‘बैलगाडा’ शर्यतीवरील बंदी उठवली”
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचे मुंबईत ‘सहा’ शिलेदार ठरले, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मोठी रणनीती