पुणे : आगामी काळात राज्यात निवडणुकांचा धुमधडका उडणार आहे. महानगरपालिका, त्यानंतर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ होणार आहे. त्यासाठी राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच भाजपच्या पुणे मिशन अंतर्गत पुण्यात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष संघटनेत अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नगर जिल्ह्यातील राजकारण तापलं, विखे-शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक
पुणे महानगरपालिकेवर सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप मोठी रणनीती आखत आहे. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून पुण्यात उद्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत राज्य पातळीबरोबरच पुण्याचीही चर्चा होणार आहे. यावेळी कार्यकारिणीत मोठे बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“कोर्टाने शिंदे गटाला बेकायदेशीर ठरवलंय, हे लोकांना पटवून सांगा”, उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आदेश
राज्य कार्यकारिणीची बैठक आणि तब्बल १८ वर्षानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक भाजपने बोलवली आहे. तसेच कार्यकारिणीची बैठकीनंतर २० मे पर्यंत नवीन शहाराध्यक्ष आणि दोन जिल्ह्याक्षांची नेमणुक करून भाजपकडून भाकरी फिरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑक्टोंबर- नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला असून पुणे महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाला राज्य कार्यकारिणीपासून सुरूवात केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांची ‘रणनीती’ ठरली, राष्ट्रवादीची मोठी फौज मैदानात, संपुर्ण महाराष्ट्र काबीज करणार ?
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिण निवडणुकीत पुन्हा एकत्र..? बीडच्या राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…“..तर मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल,” भाजप आमदाराचा थेट फडणवीसांना इशारा
हेही वाचा…आगामी महिन्यात राजकीय सभांचा धुमधडका, राष्ट्रवादी अन् सेना मैदानात, शिंदें-फडणवीसांना धास्ती ?
हेही वाचा…राष्ट्रवादीत लवकरच भाकरी फिरणार ? पक्ष संघटनेत मोठे बदल, १० जुनला मोठी सभा