मुंबई : कर्नाकच्या विजयानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील पक्षांच्या सत्ता स्थापनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांबाबत आघाडीची रणनीती ठरली. त्यानंतर आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत शरद पवारांनी राष्ट्रवादीची मोठी फळी मैदानात उतरवली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज्यातील विविध जबाबदारीही देण्यात आली.
हेही वाचा…“कोर्टाने शिंदे गटाला बेकायदेशीर ठरवलंय, हे लोकांना पटवून सांगा”, उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना आदेश
राष्ट्रवादीच्या बैठकीत पक्ष संघटनेवर भर देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी जिल्ह्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष पदांची जबाबदारी तीन वर्ष सांभाळली आहे. त्यांना आता राज्यपातळीवर नेण्यात येणार आहे. यातच आता पक्षांगर्गत निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असून यासाठी पक्षांतर्गत राज्य निवडणुक अधिकारी म्हणून जयप्रकाश दांडेगावकर तसेच मुंबई विभागीय निवडणुक अधिकारी म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा…बैठकांवर बैठका झाल्या, अन् पेच मिटला, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उद्या शपथविधी
बुथ कमिट्या बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीकडून काही नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये विदर्भ, नागपुर विभाग हा अनिल देशमुख आणि मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे देण्यात आला आहे.तर विदर्भ अमरावती विभाग हा राजेंद्र शिंगणे व अमोल मिटकरी, कोकण विभाग जितेंद्र आव्हाड व सुनिल भुसारा, मराठवाडा विभाग धनंजय मुंडे, विक्रम काळे आणि सतिश चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र विभाग हा शशिकांत शिंदे व अरूण लाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
हेही वाचा…“महाडच्या जागेवरील काॅंग्रेस अन् सेनेमधील संबंध ताणले, स्नेहल जगतापांची मोठी कोंडी” ?
पश्चिम महाराष्ट्र विभाग पुणे हा सुनिल शेळके व चेतन तुपे, पश्चिम विभाग सोलापुर, अशोक पवार व चेतन तुपे, खान्देश विभाग अनिल पाटील व एकनाथ खडसे, कोकण विभाग अनिकेत तटकरे व शेखर निकम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिण निवडणुकीत पुन्हा एकत्र..? बीडच्या राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…“..तर मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल,” भाजप आमदाराचा थेट फडणवीसांना इशारा
हेही वाचा…आगामी महिन्यात राजकीय सभांचा धुमधडका, राष्ट्रवादी अन् सेना मैदानात, शिंदें-फडणवीसांना धास्ती ?
हेही वाचा…राष्ट्रवादीत लवकरच भाकरी फिरणार ? पक्ष संघटनेत मोठे बदल, १० जुनला मोठी सभा
हेही वाचा…भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नगर जिल्ह्यातील राजकारण तापलं, विखे-शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक