मुंबई : राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच या निवडणुकांसाठी जागावाटपासाठी आघाडी एक समिती देखील नेमणार आहे. त्यामुळे याचा मोठा धसका आता शिंदे-फडणवीस युतीला लागू शकतो. त्याचबरोबर आता ठाकरेंनी बंडखोर खासदारांच्या विरोधात मोठी रणनीती आखल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा…आगामी महिन्यात राजकीय सभांचा धुमधडका, राष्ट्रवादी अन् सेना मैदानात, शिंदें-फडणवीसांना धास्ती ?
मुंबईत लोकसभेचे सहा मतदारसंघ असून उद्धव ठाकरे यांनी भाकरी फिरवण्यास सुरूवात केली आहे. शिंदे गटातील दक्षिण मध्य मुंबई मतदार संघाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना तिकीट देण्याच्या तयारीत आहे. चेंबूर, माहिम, धारावी, मानखुर्द, सायन कोळीवाडा, घाटकोपर पुर्व, भांडुप पश्चिम या भागात वंचितचा मोठा प्रभाव असल्याने उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा विचार करण्याच्या तयारीत आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादीत लवकरच भाकरी फिरणार ? पक्ष संघटनेत मोठे बदल, १० जुनला मोठी सभा
२०१७ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने प्रत्येकी तीन जागा लढवत सर्व जागांवर विजय मिळवला होता. यातच आता ठाकरे सर्व जागांची चाचपणी करीत आहे. त्यामुळे मागील विद्यमान खासदार देखील बदलवणार असल्याचं बोललं जात आहे. यातच दक्षिण मुंबईतून खासदार असलेले अरविंद सावंत यांना भाजपच्या खासदार पुनम महाजन यांच्याविरोधात उत्तर मुंबईतून लढविणार असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा…भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नगर जिल्ह्यातील राजकारण तापलं, विखे-शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक
तर राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांना दक्षिण मुंबईत तिकीट देण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम मधून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर यांच्याविरोधात विद्यमान प्रतोद सुनील प्रभू यांना तिकीट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. इशान्य मुंबईतून राष्ट्रवादीतून ठाकरे गटात आलेले संजय दिना पाटील यांना भाजपच्या मनोज कोटक यांच्याविरोधात उभं करण्याची शक्यता आहे. तर उत्तर मुंबईत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात ठाकरे गट चाचपणी सुरू केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरेंनी अलिकडेच जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी कोर्टाचा निकाल लोकांपर्यंत पोहचवण्यास सांगितलं आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना देखील केल्या आहेत. यातच शिवसेनेचा वर्धापन दिन जुन मध्ये साजरा केला जात आहे. त्यावेळी ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महाविकास आघाडी फुटायला सुरूवात, राष्ट्रवादीमध्ये अधिक जास्त….”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
हेही वाचा…‘भाजप’ही लवकरच भाकरी फिरवण्याच्या तयारीत, कार्यकारिणीची बैठकीनंतर…
हेही वाचा…शरद पवारांची ‘रणनीती’ ठरली, राष्ट्रवादीची मोठी फौज मैदानात, संपुर्ण महाराष्ट्र काबीज करणार ?
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिण निवडणुकीत पुन्हा एकत्र..? बीडच्या राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…“..तर मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल,” भाजप आमदाराचा थेट फडणवीसांना इशारा