मुंबई : मुंबई महानगरपालिकेत काॅंग्रेस स्वतंत्र लढणार असून त्याठिकाणी महाविकास आघाडी एकत्र नाही. त्यामुळे आता राज्यात महाविकास आघाडी फुटायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये अधिक जास्त घटना घडणार आहेत. असं विधान वचिंत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत लवकरच भाकरी फिरणार ? पक्ष संघटनेत मोठे बदल, १० जुनला मोठी सभा
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही वेगवेगळ्या पक्षातील असलो, तर माझे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील व्यक्तिगत संबंध चांगले आहेत. त्यामुळे मला कुणाकडेही जायला वेळ लागत नाही. काॅंग्रेसने आधीच जाहीर केलंय की, मुंबई महानगरपालिकेत ते महाविकास आघाडीत नसून स्वतंत्र लढणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी फुटायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये अधिक जास्त घटना घडणार आहेत. तिथं काय होतं? हे पाहून आणखी काही पक्ष भूमिका घेतील. अशी शक्यताही आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, नगर जिल्ह्यातील राजकारण तापलं, विखे-शिंदेंमध्ये शाब्दिक चकमक
दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहेत. त्याची तयारी सुरू करून दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘भाजप’ही लवकरच भाकरी फिरवण्याच्या तयारीत, कार्यकारिणीची बैठकीनंतर…
हेही वाचा…शरद पवारांची ‘रणनीती’ ठरली, राष्ट्रवादीची मोठी फौज मैदानात, संपुर्ण महाराष्ट्र काबीज करणार ?
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिण निवडणुकीत पुन्हा एकत्र..? बीडच्या राजकारणात एकच चर्चा
हेही वाचा…“..तर मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल,” भाजप आमदाराचा थेट फडणवीसांना इशारा
हेही वाचा…आगामी महिन्यात राजकीय सभांचा धुमधडका, राष्ट्रवादी अन् सेना मैदानात, शिंदें-फडणवीसांना धास्ती ?