अमरावती : राज्यात आगामी काळात निवडणुकांचा धुमधडका उडणार आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपासाठी आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रत्येकी ३ असे एकूण सहा सदस्यांची समिती नेमणार आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी रणनीती आखली आहे. यातच आता अमरावती लोकसभा मतदार संघावर ठाकरेचं लक्ष असून याबाबत मोठी रणनीती आखण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…‘भाजप’ही लवकरच भाकरी फिरवण्याच्या तयारीत, कार्यकारिणीची बैठकीनंतर…
महाविकास आघाडी सरकार असताना खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमावरून राणा आणि ठाकरे यांच्यात प्रचंड वाद झाला. त्यावेळी राणांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात आता नवनीत राणा ठाकरे यांच्याविरोधात सातत्याने टिका टिप्पणी करीत आहे.
हेही वाचा…शरद पवारांची ‘रणनीती’ ठरली, राष्ट्रवादीची मोठी फौज मैदानात, संपुर्ण महाराष्ट्र काबीज करणार ?
अमरवतीची जागा मागच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने अपक्ष म्हणून नवनीत राणा यांच्यासाठी सोडली होती. त्यानंतर त्याठिकाणी नवनीत राणा विजयी झाल्यात. परंतु आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना तिकीट देण्याची शक्यता आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित ! भाजपआमदार महेश लांडगे यांच्या भावना
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना केलेल्या कायद्याला यश,” बैलगाडा शर्यतीवरील कोर्टाने बंदी उठवली, फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“राज्यात पुन्हा ‘भिररर’ चा थरार रंगणार, कोर्टाने ‘बैलगाडा’ शर्यतीवरील बंदी उठवली”
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचे मुंबईत ‘सहा’ शिलेदार ठरले, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मोठी रणनीती
हेही वाचा…“महाविकास आघाडी फुटायला सुरूवात, राष्ट्रवादीमध्ये अधिक जास्त….”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान