पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील क्रिएटिव्ह अॅकडमी या निवासी शाळेतील अल्पवयीने विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नौशाद शेख असे नाराधमाचे नाव असून या प्रकरणाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेससह आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. तसेच नौशाद शेख याला फाशी देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पोलिस आयुक्तांकडे केली असून भाजपने देखील याप्रकरणात शेख याच्या घरावर बुलडोझर चालविण्याच कडक इशारा दिला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचे कोणीही काका-मामा राजकारणात नव्हते, तेव्हा…,” सुप्रिया सुळे राष्ट्रवादी निकालाच्या विरोधात कडाडल्या
पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या घटनेनं हिंदू समाज आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. म्हातारी मेल्याचे दु: ख नाही, पण काळ सोकावता कामा नये. असं सांगत याप्रकरणाचा महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे लांगडे यांनी स्पष्ट सांगितले. तसेच अशा घटनेकडे दुर्लक्ष केले आणि त्यात कठोर कारवाई झाली नाही. तर आरोपीची ताकद वाढते. आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही असा त्यांचा गैरसमज होतो. म्हणून अशा वृत्ती शहरात टिकू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा…“जखमी वाघ अधिक धोकादायक असतो”, रोहित पवारांनी राष्ट्रवादीची तुलना केली महाभारताशी!
यावेळी विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, तसेच चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप देखील उपस्थित होत्या. यातच शेख या नराधमाची केस कोणीच घेऊ नये. तसेच जर कोणत्या वकिलांनी घेतली तर त्या वकिलांचे काय करायचे ते आम्ही बघू, असा थेट इशाराच उमा खापरे यांनी देऊन टाकला. यातच अश्विनी जगताप यांनी देखील याप्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, नौशाद शेख याने २०१४ मध्येही आपल्याच संस्थेतील लोणावळ्यातील एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या अत्याचाराला आणखी काही मुली बळी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याच्या संस्थेत शिकणाऱ्या मुलींचे ब्रेनवॉशिंग करून त्यांना इस्लाममध्ये धर्म परिवर्तन करम्यास भाग पाडले जात होते का ? त्यांना अवैध मार्गाला लावले जात आहे का ? या दृष्टीनेही पोलिसांनी तपास करण्याची आणि त्याची ही अकदामीच बंद करण्याची मागणी आता सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जेव्हा घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला भीती वाटायची की…”, जंयत पाटील असे काय बोलून गेले ?
हेही वाचामोठी बातमी…! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत नार्वेकरांचा मोठा दावा, म्हणाले…
हेही वाचा…शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी निसटली, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ वाढला, असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात दाखल
हेही वाचा…वाह रे पठ्या..! मनसेने राष्ट्रवादीच्या प्रकरणात दारूगोळा भरला, अजित पवारांवर चढवला हल्ला
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, “स्वत: ला राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून उल्लेख करत..,”