मुंबई : पांडुरंगा शप्पथ सांगतो, ही वैचारीक लढाई आहे. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी लढणारी माणसं आहोत. असं गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये काय झाडी, काय डोंगार, काय हाटील म्हणत रातोरात स्टार झालेल्या आमदार शहाजी बापू पाटील यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे. तसेच शिवसेना ही आमचीच असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.
बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
एकनाथ शिंदे हे आमचं नेतृत्त्व करत आहेत. ते कणखर नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. माझ्या भाषेत सांगायचं तर मी म्हणेन की, काय ते मुंबईचा सागर बंगला, काय ते सागर बंगल्यातला देवांचा देव देवेंद्र, काय त्याने दिला आम्हाला महाराष्ट्राचा एक कणखर मुख्यमंत्री, ओक्केवाला महाराष्ट्र असं वक्तव त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.
महाराष्ट्राला पुन्हा एकदा सेनेचा मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
पुढे ते म्हणाले की, मला इतकंच कळतं की, आमची ही स्वार्थाची लढाई नाही. पण आम्हाला बंडखोर वगैरे बोललं जात आहे, हे बरोबर नाही. संजय राऊत यांच्यासारखे लोक आमच्या वैचारिक लढाईला बदनाम करत आहेत. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी लढणारी माणसं आहोत. आमची लढाई ही शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आहे. आम्ही शिवसेना संपवण्याचं पाप कधी करणार नाही. असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होताच, म्हणाले, “मीच शिवसेनेचा गटनेता”
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी नेहमी सांगत होते की, काहीही झालं तरी यंदा आषाढी एकादशीला विठ्ठालाची महापुजा ही उद्धव ठाकरेचं करतील. तर देवेंद्र फडणवीस यांना तो मान यंदातरी मिळणार नाही, अशा पद्धतीचं देखील वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं होतं. त्यामुळे ना देवेंद्र फडणवीस ना, उद्धव ठाकरे आता शासकीय महापुजेचा मान हा एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.
Read also
- “ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
- सातारा जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी; एकनाथ शिंदे सातारा जिल्हातील 4 थे मुख्यमंत्री
- शिंदे सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षांसाठी केसरकर, विखेपाटील चर्चेत; उद्या अधिवेशन
- “पहिल्या दिवसापासून सरकार पडेल, असं कोणतही वक्तव्य करणार नाही”
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ