मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी संपर्कप्रमुखांची नियुक्ती केली आहेत. पक्ष सचिव संजय मोरे यांनी यासाठी अधिकृत पत्र देखील काढलं आहे.
हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत
शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंनी संपर्कप्रमुख नेमण्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. त्यांनी स्थानिक खासदारांना याची जबाबदारी सोपवली असून मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे मावळसह, पुणे तर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे शिरूर मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर काही दिवसानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांनीही ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता.
हेही वाचा..“अयोध्यावरून ‘धनुष्यबाण’ आणून राज्यभर फिरवणार, शिंदेंची राज्यात ‘शिवधनुष्य’ यात्रा
यातच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील ठाकरेंची साथ सोडत शिंदेंची वाट धरली. याचबरोबर बारामतीचे संपर्कप्रमुख म्हणून माजी मंत्री आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांची नेमणुक करण्यात आली आहे. तर ठाणे जिल्ह्याप्रमुख म्हणून नरेश म्हस्के यांच्याकडे ठाण्यासह मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याणचीही जबाबदारी सोपवली आहे.
हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे हिंगोलीकडे नांदेड, कोल्हापुरचे खासदार संजच मंडलिक यांच्याकडे त्यांच्याच मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखाची जबाबदारी सोपविली आहे. तर यवतमाळच्या खासदार तथा संपर्कनेत्या भावना गवळी यांच्याकडे त्यांच्या मतदारसंघासोबत चंद्रपुर मतदारसंघही देण्यात आला आहे.
मुंबईतील लोकसभा संपर्कप्रमुख असे
उत्तर मुंबई – आ. प्रकाश सुर्वे – शीतल म्हात्रे
उत्तर-पश्चिम मुंबई – उदय सावंत – शीतल म्हात्रे (प्रभारी)
ईशान्य मुंबई – संजय मशीलकर – संध्या वढावकर
उत्तर-मध्य मुंबई – आ. सदा सरवणकर – वीणा भागवत
दक्षिण मुंबई – यशवंत जाधव – ममता पालव
राज्यातील इतर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मतदारसंघ – संपर्कप्रमुख
वर्धा, गडचिरोली – किरण पांडव
जालना,परभणी – मा.आ.अर्जुन खोतकर
छत्रपती संभाजीनगर – गोपाळ लांडगे
धाराशीव,लातूर – ज्ञानराज चौगूले
नंदूरबार, धुळे – चंद्रकांत रघुवंशी
जळगााव, रावेर – आनंदराव जाधव
दक्षिण नगर – विजय नहाटा
शिर्डी – यशवंत जाधव
सातारा, सांगली – मा.आ.राजेश क्षीरसागर
हातकणंगले – योगेश जानकर
पालघर, रत्नागिरी – मा.आ.रविंद्र फाटक
रायगड – आ. भरत गोगावले
Read also
- हेही वाचा..राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा नाना काटे यांना फटका?
- हेही वाचा..भाजपचं टेन्शन वाढलं..! नवव्या फेरीत 2019 मध्ये मुक्ता टिळकांना २१,००० मताधिक्य होतं, त्यावर आता धंगेकरांची आघाडी
- हेही वाचा..“कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..““कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार