मुंबई : मराठा आरक्षणावर अजूनही काही मार्ग निघतांना दिसत नाही. काल मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत बैठक बोलावली. परंतु या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. एका मुख्यमंत्र्याला डेंग्यू झाला तर दुसरा उपमुख्यमंत्री रायपुरमध्ये पक्षाचं प्रचार करण्यासाठी गेले होते. म्हणजे महाराष्ट्रात रोज आत्महत्या होत आहेत. जाळपोळ होत आहे. अन् उपमुख्यमंत्री पक्षाचा प्रचार करीत आहे. त्यामुळे यांना महाराष्ट्र महत्वाचं नाही हे यावरून स्पष्ट होतंय. अशी जळजळीत टिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीय.
हेही वाचा…वंचितचं पत्र अंतरवाली सराटी पोहचलं अन् जरांगे पाटलांनी घेतलं पाणी
मनोज जरांगे पाटलांनी जी शंका उपस्थित केली आहे. ती रास्त आहे. मराठा आरक्षण चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जाळपोळ करणारे वेगळेच असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. जणेकरून महाराष्ट्रात कोणतेही उद्योगधंदे येणार नाहीत. हा एक डाव असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.
हेही वाचा…नाशिकमध्ये शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीनामा, मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांचे राजीनामे सत्र सुरू
शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मग मधल्या काळात तुम्ही अशा शपथा का घेतल्या नाहीत? तुमच्याकडे मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास वेळ होता. तरीही यातून तुम्ही मार्ग काढा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. परंतु इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता निर्णय मंत्रिमंडळात घ्या. असंही ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा…बीडमध्ये मराठा समाज आक्रमक, राष्ट्रवादीचं कार्यालय अन आमदारांचं घरही पेटवलं
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात कॅबिनेट बैठकीत राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी विषय मांडला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यास नकार दिला तर राज्यातील सर्व ४८ खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्या. असं विधानही ठाकरे यांनी केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“राजकीय नेत्यांचे Apple फोन हॅक होताहेत,” जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची फोनवरून केली २० मिनिटे चर्चा, जरांगे पाटील म्हणाले..
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला
हेही वाचा…“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवसीय अधिवेशन बोलावा,” राष्ट्रवादीची मागणी
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू अंतरवाली सराटीत दाखल, मनोज जरांगे पाटलांशी करणार चर्चा