नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना इडीची नोटीस बजावली. याप्रकरणी येत्या 8 जून रोजी त्यांना चौकशीसाठी इडीच्या कार्यलयात बोलवलं आहे. मात्र अशातच आज सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काॅंग्रेस नेते रणदिप सुरजेवाला यांनी दिली आहे. त्यामुळे सोनिया गांधी 8 तारखेला इडीच्या कार्यलयात जाणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
काॅंग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यांसंदर्भात माहिती ट्विटवरून दिली आहे. अलिकडेच काही काॅंग्रेसच्या नेत्यांसोबत सोनिया गांधी यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर त्यांना बुधवारी सौम्य ताप आला होता. खबरदारी म्हणून त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.
“हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले
सोनिया गांधी यांच्यासोबत काॅंग्रेसचे जे नेते उपस्थित होते. त्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच आता सोनिया गांधी यांनी स्वत: ला आयसोलेट केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. व येत्या 8 जूनपर्यंत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असं म्हटलं आहे. दिल्लीतील गंगा राम रूग्णालयात सोनिया गांधीचे नियमित चेकअप करण्यात येते. त्याचबरोबर 2018 मध्ये त्यांनी अमेरिकेत जाऊनही उपचार घेतले होते. अशीही माहिती सुरजेवाला यांनी दिली आहे.
“खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला
दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना इ़डीने समन्स बजावलं आहे. तसेच त्यांना 8 जून रोजी चौकशीसाठी बोलवलं आहे. त्यावरून काॅंग्रेस नेत्यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टिका केली. तसेच सोनिया गांधी या आता इडीच्या कार्यलयात जाणार का ? हे आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?
- “संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं
- “मोदींच्या नेतृत्वाखाली एक छोटासा सैनिक म्हणून काम करणार”; हार्दिक पटेल
- भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत ‘राष्ट्रवादीचा जलवा’ ; आमदार सुनील शेळकेंनी जिंकली 12 लाखांची बोलेरो
- “विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”