पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत नुकतेच पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी पुण्यातील ससून येथील रूग्णालयाला अचानक भेट देऊन डिसाळ कामांवरून डॉक्टारांची चांगली खरडपट्टी काढली. मात्र या दौऱ्यावर त्यांच्यासोबत एक वेगळाच किस्सा घडला. त्यांनी हाफकिन संस्थेला माणूस समजून त्यांना बॅन करण्याचे आदेश दिलेत. त्यावरून राज्यातील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
बुलढाण्यात शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या सैनिकांचा तुफान राडा
प्रशांत जगताप यांनी एका वर्तमानपत्राचं कार्तन ट्विट केलं आहे. त्यात तानाजी सांवत ससून रूग्णालयात गेले असता त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी तानाजी सांवत यांनी डॉक्टरांवरही प्रश्नांची सरबत्ती केली. रूग्णालयात कमी पडणाऱ्या औषधांच्या तानाजी सांवत म्हणाले की तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधे घेता हे बंद करा. हे वाक्य ऐकताच डॉक्टरांना हसू आवरेना.
“52 पत्ते कितीही पिसले तरी त्यातील चार एक्के भाजपकडेच आहेत”; सुधीर मुनगंटीवार
त्यानंतर मंत्र्यांच्या पीएनी त्यांना हळूच सांगितलं होतं. की हाफकीन ही शासकीय संस्था आहे माणूस नाही. तेव्हा ते तेथून निघून गेले. त्यावर प्रशांत जगताप यांनी त्यांच्यावर खोचक टोला लगावला आहे.
“5 वर्षात आंबिल ओढ्याची भिंत बांधता आली नाही आणि रोप वे बांधणार, अन् बसेस पण उडवणार”
ससून येथील रूग्णालायतील प्रकारानंंतर प्रशांत जगताप यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, राज्याचे आरोग्य अडाण्यांच्या हातात आहे. नागरिकांनी स्व: ची काळजी स्व: घ्यावी, असा खोचक टोला देखील त्यांनी हाणला आहे.
राज्याचे आरोग्य अडाण्यांच्या हातात आहे. नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी. pic.twitter.com/MkDgbPN1sG
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) September 5, 2022
Read also
- “तुम्ही गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही..”; गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
- “मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव”; केंद्रीय मंत्री अमित शहाचं मराठीत सुचक ट्विट
- “..तर शिवसेना स्टाईलने त्यांचे थोबाड फोडू”; बुलढाण्यातील राड्यानंतर संजय गायकवाडांना शिवसेनेचा इशारा
- एसटीच्या 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ ; पडळकर, खोत, सदावर्ते कोणत्या बिळात जाऊन लपले ?
- “तुमची विचारधारा काँग्रेस आणि सेनेची आहे ती सांभाळा”; संजय गायकवाड