नागपूर : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण, महिला सुरक्षा, शेतकरी प्रश्न आदि मुद्यांवरून विरोधक सभागृहात सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या भुमिकेत दिसत आहेत. यातच अधिवेशनाच्या पुर्वीच नागपुरात सरकारविरोधात पोकळ घोषणांचा धुर म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार म्हणत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली.
हेही वाचा…“आरोग्य मंत्रालय भ्रष्टाचाराचे कुरण झालंय,” संजय राऊतांनी पुराव्यासह शिंदेंना धाडलं पत्र
नागपुरात उद्यापासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. कारण की विरोधी पक्षांची ज्याठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे. त्याठिकाणी विरोधकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर राज्यातील राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर असलेल्या खोचक प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. यामध्ये कोण कोणास म्हणाले म्हणत अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही. असं म्हणत त्याच्या खाली चंदगोपी असं लिहिलं आहे.
हेही वाचा…“मराठे मागास नाहीत, जरांगे पाटलांनी राजकीय पक्ष काढावा,” गुणरत्ने सदावर्तेंचा हल्लाबोल
ओबीसी मुद्यावरून बोलायचे असे तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, मंत्रिमंडळातून बाहेर पडून त्यांनी यावर बोलावे, असं म्हणत त्याच्या खाली राधाकिशन भाऊ असं लिहिलंय. मला शिंदे सोबतचा भाजप आवडत नाही. मला अजितदादांसोबतचा भाजपही आवडत नाही. मला देशाची सेवा करणारा भाजप आवडतो. असं म्हणत त्याखाली अधीर भाऊ असं म्हटलंय. सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, हे महादेवा मला मंत्री करा. गोगा मास्टर मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. रामाचे दास, असं म्हटलंय.
हेही वाचा…“दादा तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक अब्ज तयार केले असतील, पण..,” आव्हाडांची अजितदादांवर खोचक टिप्पणी
दरम्यान, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्टून असलेलं पोकळ घोषणांचा धुर या बॅनरखाली आरोग्य यंत्रणा, महिला सुरक्षा, ड्रग्ज निर्मिती, प्रदुषण, मित्राचा कारभार, दुष्काळ, महागाई, पेपरफुटी, उद्योग, गुन्हेगारी, नोकरभरती, आरक्षण, कायदा व सुव्यवस्था असं म्हणत खोके सरकार, आजारी सरकार, असे सर्व मुद्दे घेतले आहेत.
तिघांच्या खांद्यावर एकमेकांचे ओझे
खोके सरकार ठरतंय जनतेवर बोझे pic.twitter.com/p95Egrt6DL— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार”, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“भुजबळांना लोळवलं नाही तर नाव बदलून ठेवणार”, जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा
हेही वाचा…उद्धव ठाकरे, पटोले आणि बावनकुळेंची एकाच ठिकाणी व्यवस्था, अधिवेशनासाठी जय्यत तयारी
हेही वाचा…राजस्थान हादरल..! राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळी घालून ह’ त्या , व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…आता राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून दोन गटात वाद, अजित पवार गट म्हणतो की,..