IMPIMP
Suspension of 141 MPs Sule and Kolhe's suspension, Anil Deshmukh's venomous criticism of the central government Suspension of 141 MPs Sule and Kolhe's suspension, Anil Deshmukh's venomous criticism of the central government

१४१ खासदारांचं निलंबन ;सुळे आणि कोल्हेंचं निलंबन, अनिल देशमुखांची केंद्र सरकारवर जहरी टिका

नवी दिल्ली : संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर गृहमंत्र्यांनी निवेदन देण्यात यावे, यासंदर्भात चर्चा करण्यात यावी, या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षातील खासदारांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर लोकसभा अध्यक्षांनी काल एकाच दिवसात ४६ खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. तर राज्यसभेतील ४६ असे एकूण ९२ खासदारांचं निलंबण करण्यात आलं. यानंतर आज ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. यातच आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील निलंबन करण्यात आलंय. यावरून आता माजी मंत्री अनिल देशमुख यांनी टिका केली आहे.

हेही वाचामराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसोबत सरकारची रणनीती ठरली ? 

१४१ खासदारांचं निलंबन ही घटना हुकूमशाहीची आहे. हे योग्य नाही. संसदेत घुसखोरी करण्यासंदर्भात चर्चा व्हावी ही मागणी सदस्यांची होती. त्यात चुकीचं काय आहे? विरोधकांचं काम असतं विरोध करणे, आवाज उठवणे, यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन करणं योग्य नाही. माझ्या राजकीय जीवनात मी असे पहिल्यांदा पाहिलंय अशी टिका राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केलीय.

हेही वाचा“‘त्या’ व्हिडीओत बडी भाभी म्हणजे तुम्हीच का ?” सलीम कुत्ता प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी देवयानी फरांदेंना डिवचलं 

संसद घुसखोरी प्रकरणावरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरक्षासंदर्भात चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधक करतांना दिसत आहेत. तर यावर लोकसभा सचिवालयाकडे सुरक्षेची जबाबदारी असल्याचं स्पष्टीकरण लोकसभा अध्यक्षांकडून केलं जात आहे. त्यावर आज ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर आतापर्यंत जवळपास १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलंय. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांना निलंबन करण्यात आलंय.

हेही वाचा“तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही”, ९२ खासदारांच्या निलंबणाच्या कारवाईवर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया 

लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, काॅंग्रेसचे खासदार शशी थरूर, समाजवादी पार्टीच्या खासदार डिंबल यादव यांच्यासह ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

READ ALSO :

हेही वाचासुप्रिया सुळे लोकसभेतून निलंबित ; लोकसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय 

हेही वाचा“वेळ मिळेल तेव्हा आम्हाला चिमटे काढत बसतात”, शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

हेही वाचा“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला पनवती लागली”, कुणी केली टिका ? 

हेही वाचा…“उगीच मी हुडी, गॉगल घालून फिरत नाही”, ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला 

हेही वाचा…“शरद पवारांचा कार्यकर्ता, जरांगेंसोबतही चांगले संबंध,” अंतरवाली सराटी घटनेतील आरोपीची प्रतिक्रिया