विरेश आंधळकर, पुणे: संपूर्ण भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करणारा पक्ष म्हणून भाजपला ओळखलं जातं. 2014 पासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणारी भाजप टेक्नोसावी म्हणून ओळखली जाते. परंतु पुणे शहर भाजपला फेक मॅसेज कळेना का? असा प्रश्न सद्या निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे आज BJP PUNE या फेसबुक पेजवर करण्यात आलेली पोस्ट.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिंदेंची अर्धा डझन मंत्र्यांची फौज पंढरपुरात जाणार, विठुरायच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार ?
“महाराष्ट्र सरकारकडून नवा निर्णय” या मथळ्याखाली ही पोस्ट करण्यात आली आहे. महिलांसाठी पोलिसांनी मोफत राईड योजना सुरू केल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. परंतु या पोस्टची “फॅट चेक’ केली असता, हा मॅसेज फेक असल्याचं पुढे आलं आहे.
BJP PUNE फेसबुक पेजची पोस्ट नेमकी काय?
“महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय, महाराष्ट्र पोलिसांनी मोफत राईड योजना सुरू केली आहे, जिथे महिलांसाठी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत एकट्या घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नाही, महिला पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर १०९१ किंवा ७८३७०१८५५५ नंबर वर कॉल करू शकता आणि वाहन मागू शकतात” असं BJP PUNE या फेसबुक पेजच्या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. “हा क्रमांक २४×७ कार्यरत असेल कंट्रोल तुमचे वाहन किंवा जवळपासचे PCR/ SHO वाहन येईल आणि तिला सुरक्षित घरी सोडेल” असा दावाही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांची प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा पुर्ण होणार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आज निर्णय घेणार”
व्हायरल मॅसेजचा FACT CHECK
BJP PUNE फेसबुक पेजवर करण्यात आलेल्या पोस्टची शहानिशा केली असता संबंधित पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेला संपर्क क्रमांक हा पंजाब राज्यातील लुधियाना शहर पोलिसांचा हेल्पलाईन नंबर असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे आजवर या फेक मॅसेजमुळे हजारो फोन पंजाब पोलिसांना आल्याची माहिती पुढे आली आहे. 2019 साली देखील हाच मॅसेज तत्कालीन “उद्धव ठाकरे सरकारचा नवा निर्णय” म्हणून व्हायरल झाला होता.
READ ALSO :
हेही वाचा…BRS पक्षात प्रवेश करतात भगीरथ भालकेंचा पवारांना कडक शब्दात इशारा ! म्हणाले की, “उद्यापासून भालके काय चीज..”
हेही वाचा…भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटणार, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसणार, सर्व्हे आला समोर
हेही वाचा…सदाशिव पेठेत तरुणीवर हल्याचा थरार, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची बापटांची मागणी
हेही वाचा…नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, भाजप आमदाराच्या बंधूचा पटोलेंच्या उपस्थित काॅंग्रेसमध्ये प्रवेश
हेही वाचा…मुसळधार पावसात ”मुसळधार मोर्चा” होणार, ठाकरे गटाचा ‘राज्य सरकार’ विरूद्ध एल्गार