मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावे, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाने महापालिकेसाठी अर्ज केले होते. मागच्या वेळी शिवतीर्थ मैदान ठाकरे गटाला मिळालं होतं. त्यामुळे याही वेळेस आम्हालाच मिळावं अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. यातच मंत्री दिपक केसरकर यांच्या विधानानंतर ठाकरे गटासाठी शिवतीर्थ मैदानाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी, अन् ‘या’ जिल्ह्यात तब्बल ३०९ कार्यकर्त्यांनी पवारांची साथ सोडली
आमचा दसरा मेळावा हा क्रास आणि ओव्हल मैदानावर होणार आहे. त्यांना फक्त सहानुभूतीचं राजकारण करायचं आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नाही. बाळासाहेबांच्या विचारापासून लांब गेलेच परंतु हिंदू धर्माला शिव्या दिल्या गेल्या त्यावेळी त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर आला नाही. त्यामुळे तुम्ही दसरा मेळावा घ्या, लोकं जमा करा, पंरतु तुमच्या सभेपेक्षा आमच्या सभेला चौपट लोक राहतील, असं मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून पवारांवर दुसऱ्यांदा केला गंभीर आरोप,” आयोगात जोरदार खडाजंगी
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी महापालिकेसाठी मैदानासाठी किंवा बीएमसीसाठी मागणी केली असेल तर त्यांनी आरशासमोर राहुन स्वत: चा चेहरा पाहावं. आपल्या मनाला विचारावं की आपण खरोखरच शिवसेना आहोत का ? दिल्लीच्या भाजपच्या नादाला लागून लफंगेगिरी करत आहोत का ? महाराष्ट्राच्या १८ कोटी जनतेला माहिती आहे, शिवसेना कुणाची आहे ? असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पाठीमागून वार करणे सोडा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर..”, भाजपच्या महिला आमदाराने दिला भाजपच्याच पदाधिकाऱ्याला सज्जड दम
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम, कार्यक्रमात साप शिरला अन्….
हेही वाचा…धक्कादायक..! “शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जा’ळ’ले,’ सुळेंचा सरकारवर पारा चढला, केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“ज्या दिवशी माझी बोलायची वेळ येईल, त्यावेळी मी या सर्वांना ‘न’ग्न’ करून टाकेन”, शिंदे गटाच्या आमदाराचा पारा चढला
हेही वाचा…“राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,” ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश