अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची राजू शेट्टी यांनी पक्षातून हाकालपट्टी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडण्याचा देखील निर्णय घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र भुयार हे कोणत्या पक्षात जातील यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला अन् डोळ्यात पाणी आलं! मनसे उपाध्यक्षांनी दिला राजीनामा
ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला, आमदार देवेंद्र भुयार यांच्यासारख्या चुकीच्या पाठीशी उभा राहिलो, याबद्दल मला माफ करा आणि मी तुमची जाहीर माफी मागतो असं म्हणत राजू शेट्टींनी भुयार यांची हकालपट्टी केली होती. यानंतर त्यांनी फेसबुकवर पोस्ट करत धन्यवाद म्हणाले होते. यामुळे त्यांनी संघटनेपासून संबंध तोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीसह मुख्यमंत्र्यांचा देखील वसंत मोरेंना फोन! शिवसेनेत येण्याचं केलं आव्हान
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित देवेंद्र भुयार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहे. त्यांचा हा पक्ष प्रवेश सोहळा 10 एप्रिलला होणार असल्याचं संंकेत मिळत आहेत. गेल्या 23 वर्षापासून विदर्भात पाहिजे तसा राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा जर पक्षात प्रवेश झाला तर त्यांच्याकडे विदर्भाची मोठी जबाबदारी देणार असल्याचं बोलण्यात येत आहे.
यशंवत जाधवांना आयकर विभागाचा झटका ! 40 मालमत्तांवरसह 26 फ्लॅट्सवरही जप्तीची कारवाई
दरम्यान, देवंद्र भुयार हे स्वाभिमानीचे आमदार होते. मात्र ते वरूड-मोरशी मतदारसंघातून आमदार आहेत. ती जागा राष्ट्रवादीसाठी राखीव होती. ते आजही विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सहयोगी म्हणूनच आहेच त्यामुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतृत्व नक्कीच त्यांच्या पक्षप्रवेशाचा विचार करतील, असं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश संजय खोडके म्हणाले आहेत.
Read also:
- “वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”
- कोल्हापूरात महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार; हसन मुश्रीफांचा विश्वास
- वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर पुण्यात मनसेला गळती; पदधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी खळबळ
- ज्यांची औकात नाही, त्यांना तुरूंगात टाका; अबु आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा
- माझी राजकीय अथवा आत्महत्या झाली नाही; वसंत मोरे यांचा रूपाली पाटलांना प्रत्युत्तर