IMPIMP
The real coronation of Shiva on June 6, 2024, then the thought of celebrating it today came out of whose fertile head The real coronation of Shiva on June 6, 2024, then the thought of celebrating it today came out of whose fertile head

“खरा शिवराज्याभिषेक ६ जून 2024 ला…! मग आज साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला ?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्री, आमदार, खासदार देखील उपस्थित होते. परंतु आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज राज्य सरकारवर कडाडून टिका केली आहे.

हेही वाचा…“भाऊ बहिणींसाठी धावला अन् निवडणुक बिनविरोध झाली”, मुंडे भाऊ-बहिणींचा निवडणुकीत दणदणीत विजय 

महाराष्ट्रावर काय दिवस आले आहेत. निवडणुकांसाठी वाट्टेल ते. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा दिनांक ६ जून, १६७४ रोजी झाला. इथे मात्र निवडणुकांचे गणित समोर मांडून राज्याभिषेक साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. शिवराज्याभिषेक दिनाची तारीख जगामध्ये सगळ्यांना माहिती आहे ती ६ जून, १९७४ आहे. याचाच अर्थ ३५० वा शिवराज्याभिषेक दिन हा ६ जून २०२४ रोजी आहे. मग आज शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला. असा सवाल आव्हाडांनी राज्य सरकारला केला आहे.

हेही वाचा…शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या डोक्यात शिजतोय ‘हा’ प्लॅन..! अमोल कोल्हेंसह ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून जर असे राजकारण होत असेल तर उभ्या महाराष्ट्राची आज शिवराज्याभिषेक साजरा करण्यांनी माफी मागवी. हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि हिंदू धर्मातील ज्या एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला व तुम्ही शुद्र आहात असे म्हटलें. तेच आज तिथे जाऊन सांगत आहेत की, सनातन धर्माचे पालन करा. असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी लगावला.

हेही वाचा…उद्धव ठाकरे परदेशात, शरद पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, भेटीचं कारण आलं समोर 

दरम्यान, ज्या सनातनी प्रवृत्तीने शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्यानाच डोक्यावर घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करुन तिथीनुसार हा कार्यक्रम राबवलाय. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता याचं चोख उत्तर देईल. तुम्ही रायगडाच्या पवित्र भुमित सनातनी सत्तेचा उन्माद केलाय. अशी टिका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“फक्त शारिरिक भूक भागवायला भाजप नेत्यांना मुली हव्या आहेत का?” काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका 

हेही वाचा…“छत्रपती शिवाजी ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं”, शिवराज्याभिषेकाच्या दिवशी राज ठाकरे भावूक 

हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सिंहासन लवकरच हालणार,” पवार-शिंदे भेटीनंतर सुचक संकेत 

हेही वाचा…शिवराज्याभिषेक सोहळा..! मुख्यमंत्री पुजेला खाली बसले, मात्र छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजेंना प्रेक्षक म्हणून उभं केलं, राष्ट्रवादीची टिका 

हेही वाचा…मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा..! उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार सोडणार ‘हे’ दोन लोकसभा मतदारसंघ