मुंबई : राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे आशा आशायाची जाहिरात आज शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लावण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न शिंदेंकडून करण्यात आला आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपला डिवचण्यात आलं आहे.
हेही वाचा…‘मिशन बारामती’, बारामती लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची व्युहरचना
शिवसेनेकडून आज बहुतांश वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात देण्यात आली असून याध्यमातून सरकारच्या कामगिरीवर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट तुलना कधीही करण्यात आली नव्हती, मात्र जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही”, हसन मुश्रीफांचा विरोधकांना टोला
अरेरे हे हो काय? ‘राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे’. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के तर एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के लोकांची पसंती दिली आहे. काय हे दिवस आणलेत भाजपवर? असा सवाल करीत भाजपच्या आयटी सेलच्या लवारीस कार्ट्यांना व कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेऊन हे सगळे बघावे लागलेत. असा शाब्दिक टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंची राज्याबाहेरच पहिल्यांदाच बैठक, केंद्र स्तरावर भाजपसोबत काम करण्यास शिंदेंची सुरूवात
तर शिंदे फडणवीसांना विसरले आहेत. बाळासाहेबांना विसरायला नको, जाहिरातीत फडणवीसांचा फोटो नाही ही शिंदेंची मोठी झेप आहे. जाहिरातीत फडणवीसांचा फोटो नाही बघून अनेकांची मनं दुखावली असतील. असं राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी टिका केली आहे.
अरेरे हे हो काय?’राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे’… मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्रजीं २३.२% तर एकनाथजींना २६.१% टक्के लोकांची पसंती..काय हे दिवस आणलेत भाजपवर? भाजपच्या IT सेलच्या लवारीस कार्ट्याना व कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवून हे सगळे बघावे लागतेय, धिक्कार असो 😄 pic.twitter.com/N8uSmQDvCy
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांपेक्षा शिंदेंना पसंती, शिवसेनेची जाहिरात भाजपला चिमटा?
हेही वाचा…‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे अन् फडणवीसांचे ‘दोन’ भिडू भिडले, मोठा वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…“औकातीत राहायचं तु गद्दार आहेस, जर तोंड उघडलं तर भारी पडेल”, राजन विचारे शिंदेंवर संतापले
हेही वाचा…गद्दार सरकारची वर्षपुर्ती येतेय, तुम्ही जरा सांभाळून रहा एकनाथ शिंदे टोला
हेही वाचा…“शरद पवारांचा वैचारिक व्हायरस संपवणार,” गुणरत्ने सदावर्तेंची टिका, नथूराम गोडसेचाही कार्यक्रमात फोटो लावला