पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्या प्रचाराचा नारळ काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी फोडला. काल महाविकास आघाडीचे काल असंख्य कार्यकर्ते काल रॅलीत सहभागी झाले होते. या पोटनिवडणुकांसाठी अनेक स्टार प्रचाराक असून आज चिंचवडमध्ये सभा होत आहे. या सभेत अजित पवार, जंयत पाटील, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांची देखील सभा होत आहे.
हेही वाचा..आता माघार नाहीच, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी, राहुल कलाटे सत्ताधारी आणि विरोधकांचा घाम फोडणार?
चिंचवड पोटनिवडणुकीत आज सकाळी आदित्य ठाकरे यांची सभा होत आहे. भाजपकडून अश्विनी जगताप तर आघाडीकडून नाना काटे यांना तिकीट देण्यात आलं आहे. परंतु यामध्ये राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केल्याने ही लढत आता तिरंगी होणार आहे. यातच राहुल कलाटे यांनी पहिल्या निवडणुकीत शिवसेनेकडून पाठिंबा घेतला होता. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी अर्ज काही मागे घेतला नाही.
हेही वाचा..“आम्ही ज्वारी, बाजरीच भाकर खातो, पण काही लोकांसाठी हे नवं आहे”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
यातच आता आदित्य ठाकरे राहुल कलाटे यांच्यावर काय भाष्य करणार ? त्याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे. त्याचबरोबर यातच अलिकडेच कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांनी जनतेला मार्गदर्शन करतांना भाजपवर कडाडून टिका केली. यावेळी लोकांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला.
हेही वाचा..“मावळ लोकसभेसाठी सुनील शेळकेंचे चिंचवडमधून ‘रणशिंग’ – विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना आव्हान
दरम्यान, भाजपकडून देखील दोन्ही पोटनिवडणुकांसाठी प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पुण्यात निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून सत्ताधारी आणि विरोधक यापोटनिवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आले आहेत. या पोटनिवडणुसाठी येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 02 मार्चला मतमोजणी होणार आहे. ह्या पोटनिवडणुका आगामी विधानसभेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट समजली जात आहे. त्यामुळे यासाठी आता जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
Read also
- हेही वाचा..“महाराष्ट्रात गुंडागर्दी, दादागिरी, दाऊद फाऊद..”जाता जाता कोश्यारींचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
- हेही वाचा..““‘एक अकेला सबपे भारी’ म्हणणाऱ्या घमेंडखोर मोदी सरकारला अखेर विरोधकांसमोर झुकावे लागले”
- हेही वाचा..““गुजरात काय उद्या अमेठीलाही आपला प्रकल्प गेला तर त्याचा विरोध करेन”, सत्यजीत तांबे
- हेही वाचा..““काॅंग्रेसमध्ये कोणतीही खदखद नाही, भाजपकडून काॅंग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न,” नाना पटोले
- हेही वाचा..“डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास होईल,” मोदींचा मुंबईत हल्लाबोल