मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत राज्य सरकारविरोधात आरोपांची गरळ ओकली होती. त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका करत मुंबईबद्दल भाष्य केलं होतं. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषण झालं होतं. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रताप सरनाईक यांना इडीचा दणका; कारवाई करत 11.36 कोटींची संपत्ती जप्त
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले की, रावणाचा जीव बेंबीत होता. तसा काहींचा जीव मुंबईत अडकला आहे. काही दिवसात मुंबई महानगरपालिकेची निवडणुक होऊ घातली आहे. त्यात भाजप तीन दशकापासून ठाण मांडून बसलेल्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मंबईत सध्या राजकीय नेत्यांची जोरदार फटकेबाजी सूरू आहे.
स्वाभिमान पक्षाचे एकमेव आमदाराची पक्षातून हाकलपट्टी; कार्यकर्त्यांचा ढोल वाजवत आनंद साजरा
ते पुढे म्हणाले की, कोरोना काळात केंद्र सरकारने राज्य सरकारला फार मदत केली. कोरोनाशी लढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना पक्षीय भेद न करता मदत केली. मात्र केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर घेतले गेले परंतु ते चालले नाहीत. केंद्रीय सचिवांचा गट तयार केला गेला. त्यात केंद्रांन काही काळ पीपीई किट दिलं. धारावा वाचवली हे केवढं मोठं काम झालं, केंद्राचं पथक याठिकाणी येत होते. धारावीला वाचवायला सांगायचे त्याचबरोबर महापालिका कर्मचारी आणि आयुक्तांनी उत्तम काम केलं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले.
टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची; राऊतांच्या वक्तव्याला राणांची मिश्कील टिप्पणी
दरम्यान, मी पेनड्राईव्ह दिल्यावर लोकांना राग येतोय मात्र त्या दिवशी लागलेल्या लाईनचाही पेनड्राईव्ह मी द्यायला तयार आहे. सोलापूरात एक सचिन वाझे दर महिन्याला लाखो रूपये गोळा करत आहे. धुळ्याच्या उपनिबंधकाला वरीष्ट लिपीकाने लाच मागितली. तक्रारी केल्यानंतर सभागृहात बोलणाऱ्या आमदारांना खुन्नस धरतात. राऊत अपक्ष निवडणून आल्याने कारवाई होत नाही. याचं गृहराज्यमंंत्र्यांनी छातीवर हात ठेवून बैठकीत काय झालं सांगावं. मविआचा अर्थ महाविनाश, महावसुली आणि मद्यविक्री आघाडी असा आहे, असा हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर चढवला होता.
Read also:
- “आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं.. असं करायचं नाही” मुख्यमंत्र्यांचा सुधीर मुनगंटीवारांना टोला
- ठाकरे, फडणवीस, पवारांच्या तोफा धडाडणार ; कोल्हापूर उत्तरेत रंगणार राजकीय कुस्तीचा फड
- कंगना रणावत अन् गोस्वामींवर हक्कभंग आणल्यानंतर कारवाई; इडीच्या कारवाईनंतर सरनाईकांची प्रतिक्रिया
- राणे कुटुंबियांवर कारवाई न केल्यास आत्महत्या करू; दिशा सलियनच्या आईचे राष्ट्रपतींना पत्र
- “वडिलांना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला”; सदाभाऊ खोतांनी मानले फडणवीसांचे आभार ;