IMPIMP
Until today, someone said that NCP is a party of Marathas Sharad Pawar group's sharp question to Fadnavis Until today, someone said that NCP is a party of Marathas Sharad Pawar group's sharp question to Fadnavis

राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष, असे आजपर्यंत कुणी हिणवलं ? फडणवीसांना शरद पवार गटाचा तिखट सवाल

नागपूर : मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपुर येथे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपची बैठक पार पडली. त्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संबोधित करतांना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर आरोप केले आहेत. त्यावरून भाजप आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच देवेंद्र फडणवीसांच्या टिकेला आता शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा…राज्यात गुंडाराज..! रिल्सस्टार मुलीला कारखाली चिरडलं, आरोपी मोकाट, विरोधकांचा सरकारवर संताप 

शरद पवारांवर आरोप करत मराठा आरक्षण मुद्यावर देवेंद्र फडणवीसांचा आता राजकीय डाव सुरू झाला आहे. याचा अर्थ निवडणुक जवळ आली आहे. त्यांची खोटं बोलण्याची सवय जुनीच आहे. मंडल आयोग शिफारशी लागू केल्यावर मंडल विरूद्ध  कमंडल यात्रा कोणत्या पक्षाने काढली होती ? व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा भाजपने का काढला होता ? ओबीसी विरूद्ध देशात आंदोलन दंगली कुणी घडवल्या होत्या? राष्ट्रवादी काॅंग्रेस हा मराठ्यांचा पक्ष आहे. असे आजपर्यंत कुणी हिणवलं होतं ? त्यावरून माधव हा राजकीय मतांचा फॉर्म्युला कुणी निर्माण केला होता. ? या प्रश्नांची उत्तर तुम्ही देणार नाहीत पण देशाला व राज्याला सत्य माहिती आहे. सद्या मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण कुणी निर्माण केले आहे ? हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पहातोय. असंही विकास लवांडे यांनी म्हटलंय.

हेही वाचा…“टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन मोर्चा काढला जाणार”, फडणवीसांची ठाकरेंवर टिका 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतांना सुप्रिया सुळे यांचं विधानं आपण पाहिली आहेत. मंडल आयोग लागू झाला. तेव्हा देता आलं असता. न्यायालयाचे निवडे आले. तेव्हा देता आले असता. परंतु त्यांना कधीच द्यायचं नसंत. त्यांना फक्त समाजाला झुंजवत ठेवायचं होतं. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. परंतु आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेच, परंतु कोर्टात ते टिकवून ठेवलं. त्यानंतर सरकार गेल्यानंतर त्यावर स्थगिती आली.

READ ALSO :

हेही वाचा…“बिनडोक, दुरदृष्टी नसलेला व्यक्तीच्या दबावापोटी लोकांच्या भविष्याशी खेळणे सरकारला शोभते का?” रोहित पवारांचा रोख कुणाकडे ? 

हेही वाचा…एैसा कैसा चलेगा टोमणेसम्राट??? धारावीच्या मोर्चावरून शिंदे गटाने ठाकरेंना डिवचलं

हेही वाचा“जागांची चिंता करू नका, लोकसभा अन् विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागा ,” देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना 

हेही वाचा“मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

हेही वाचा...नितेश राणेंना मोठा झटका, कोर्टाने ‘तो’ अर्ज फेटाळला, ३० जानेवारील हजर राहण्याचे कोर्टाचे सक्तीचे आदेश