IMPIMP

राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट, हा त्यांना संपवण्याचा कट तर नाही? नाना पटोलेंचा रोख कुणाकडे?

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे गांधी यांचे, दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर भेटीसाठी सोमवारी काश्मिरात आगमन झाले. यांनतर ते सकाळी चिनार वृक्षांच्या रम्य परिसरात असलेल्या खीर भवानी मंदिरात गेले. मंगळवारी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील खीर भवानी मंदिराला, तसेच हजरतबाल या मुस्लिमांच्या धार्मिक स्थळास भेट दिली. दरम्यान, ते या दौऱ्यावर असतानाच काश्मीर बॉम्बस्फोटांनी हादरून गेले.

मंत्रालयात सापडलेल्या दारूच्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात; संजय राऊतांनी भाजपला फटकारले

या पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये ‘व्यर्थ ना हो बलिदान’ कार्यक्रमात बोलताना, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, “राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा काय झाला? देशासाठी गांधी कुटुंबातील दोन व्यक्तींनी आपलं रक्त देशाच्या मातीत सांडलं आहे. आज राहुल गांधी देशाच्या जनतेचा आवाज काम करत आहेत. त्यामुळे, हा त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना?” असा सवाल करत त्यांनी सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हर्षवर्धन आणि विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय पुनर्वसनासाठी ‘गुफ्तगू’ केल्याच्या चर्चा

“राहुलजी जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. त्यांनी तिथला दौरा केला आणि तिथे बॉम्बस्फोट झाला. दैव बलवत्तर म्हणून ते त्याआधीच तिथून गेले होते. हा हल्ला राहुल गांधी थांबले होते, त्या ठिकाणापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर झाला. तुमच्याकडे इतकी मोठी यंत्रणा कार्यकर असताना दहशतवादी आलेच कुठून? आणि त्यांनी राहुल गांधींच्या अगदी जवळच्या ठिकाणावर हल्ला केलाच कसा?” असा सवाल आक्रमक होत त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यांनी आता नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read Also :