पुणे : भाजप खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. यामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी लवकरच पोटनिवडणुक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यात सुरूवात केली आहे. पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा…“पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं, तेव्हापासून षडयंत्राला सुरूवात झाली”, आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
भाजपकडून दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट , माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे, पुणे शहाराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावं सध्या चर्चेत आहेत. दुसरीकडे कसबा विधानसभेतील यशानंतर पुण्यात बळ मिळाल्याने महाविकास आघाडी देखील आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा…“भाजपने एक कबुल केले की, अजितदादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते”
महाविकास आघाडीमध्ये कसबा पेठ विधानसभा कॉंग्रेससाठी सोडल्याने आता पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे केली जात आहे. बालेकिल्ला असलेली कसब्याची जागा हातून सुटल्याने भाजप देखील सर्व बाजूने खबरदारी घेत आहे. यामध्ये भाजपकडून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या नावाची देखील चाचपणी केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
पुणे लोकसभेसाठी चंद्रकांत पाटलांचं नाव चर्चेत येण्याची कारणे
1 ) चंद्रकांत पाटलांकडे गेल्या चार वर्षापासून पुण्यात पक्षाची धुरा आल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क.
2 ) सुरक्षित आणि संघटनेवर चांगली पकड असणारा नेता म्हणून चंद्रकांत पाटलांची ओळख
3) विद्यार्थी संघटनेपासून ते भाजप प्रदेशाध्यक्षपदापर्यंतकाम केल्याने प्रदीर्घ राजकीय अनुभव
३ ) पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात परिचित नाव
४ ) कोथरूड मतदारसंघात केलेल्या कामांमुळे विकासाभिमुख चेहरा म्हणून ओळख निर्माण
५ ) लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षात इच्छुकांची संख्या असल्याने कोण एकास उमेदवारी दिल्यास नाराजीचा फटका बसण्याची शक्यता. नाराजी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचं नाव पुढे केलं जाण्याची शक्यता.
Read also
हेही वाचा…अदाणींबाबत केलेल्या शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले की,,,
हेही वाचा…“रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंच्या टिकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले की,,,,,
हेही वाचा…“ना पक्षात एकमत, ना महाविकास आघाडीमध्ये, 2024 ला आयेगा तो मोदीही”, भाजपने राष्ट्रवादीला डिवचलं
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की थेट लढत ? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
हेही वाचा…“थोडी नैतिकता दाखवून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, सुषमा अंधारेंची मागणी