नाशिक : राज्यात सध्या इव्हीएम मशिन आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावरील जेसीपी चौकशीवरून वाद सुरू आहे. एव्हीएम मशीन आता बंद झाल्या पाहिजे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगतातहेत तर यावर अजित पवार यांचं वेगळंच मत आहे. तशाच प्रकारे शरद पवार यांनी जेपीसी चौकशीला विरोध दर्शविला आहे. यावरून आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यय यांनी यावर खोचक टिप्पणी केली आहे.
हेही वाचा…“सध्या कलयुग सुरूअन् रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले”, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर जहरी टिका
एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ म्हणतात की एव्हीएम नको. तर दुसरीकडे अजित पवार म्हणतात की एव्हीएम मध्ये काहीच दोष नाही. एका पक्षात एकमत नाही. तिकडे राहुल गांधी म्हणतात जेपीसी हवी. तर शरद पवार म्हणतात जेपीसी नको. अरे… ना पक्षात एकमत ना महाविकास आघाडीमध्ये एकमत. ही कसली वज्रमुठ ही तर बनवाबनवीची मुठ म्हणून २०२४ मध्ये आयेगा तो मोदी ही असं म्हणत केशव उपाध्यय यांनी आघाडीला डिवचलं आहे.
हेही वाचा…तब्बल १७ तास नॉटरिचेबल..! बंडाच्या तयारीत ? अजित पवार अवतारले अन् सांगितली सगळी हकीकत
जेपीसी समितीमध्ये सत्ताधारी पक्षातीलच जास्त सदस्य असतील, त्यात विरोधी पक्षातील कमी सदस्य असणार, त्यामुळे योग्य ती चौकशी होणार नाही. असं शरद पवारांनी म्हटलं आहे. तर काॅंग्र्सने पहिल्यापासून जेपीसी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेणारा बांग्लादेश शेवटचा देश असून त्यांनी देखील ते बंद केलं आहे. त्यामुळे भारतात देखील इव्हीएम बंद झालं पाहिजे असं राऊतांनी म्हटलं. तर इव्हीएममध्ये काहीच दोष नाही, असं अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यावरून भाजपने हा निशाणा साधला आहे.
एकीकडे @ChhaganCBhujbal म्हणतात की EVM नको. @AjitPawarSpeaks म्हणतात EVM मध्ये काहीच दोष नाही. एका पक्षात एकमत नाही. तिकडे @RahulGandhi म्हणतात जेपीसी हवी @PawarSpeaks म्हणतात जेपीसी नको. अरे ना पक्षात एकमत ना महाविकास आघाडीमध्ये एकमत. ही कसली वज्रमुठ ही तर बनवाबनवीची झाकली मुठ…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 8, 2023
Read also
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार की थेट लढत ? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
हेही वाचा…“थोडी नैतिकता दाखवून देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, सुषमा अंधारेंची मागणी
हेही वाचा…“पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं, तेव्हापासून षडयंत्राला सुरूवात झाली”, आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
हेही वाचा…“भाजपने एक कबुल केले की, अजितदादा राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तीशाली नेते”
हेही वाचा…“गौतम अदाणी प्रकरण..! जेपीसी चौकशीला शरद पवारांचा विरोध, सुचवला दुसरा पर्याय