पुणे । विशेष प्रतिनिधी पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन नवीन जिल्हा तयार करावा आणि त्याला ‘शिवनेरी’ हे नाव द्यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी केली. त्या मागणीला भारतीय जनता पार्टीकडून ‘बळ’ देण्यात येत आहे. कारण, भाजपाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये उत्तर पुणे जिल्हा आणि दक्षिण पुणे जिल्हा असे दोन विभाग करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली.
हेही वाचा…पटोलेंविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या वडेट्टीवारांचा दिल्ली खुलासा, म्हणाले, की आमच्यात…
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे शहर प्रभारी म्हणून अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रभारी म्हणून वर्षा डहाळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंनी गोंदियात ‘राष्ट्रवादी’ फोडली…! नगराध्यक्षसह १५ नगरसेवक शिंदे गटात दाखल
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नियुक्ती देण्यात आलेले राजेश पांडे यांना आता पुणे ग्रामीण आणि मावळचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने पुणे जिल्ह्यासाठी भाकरी फिरवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, भाजपाकडून आता नवीन २ विभाग करण्यात येणार आहेत. त्यात उत्तर पुणे जिल्हा आणि दक्षिण पुणे जिल्हा असे विभाग करण्यात येणार आहेत. त्यासाठी २ जिल्हाध्यक्ष देखील निवडले जाणार आहेत.
हेही वाचा…६६ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार; अलई यांनी केलेल्या पाठपुराव्याला आले यश
पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन ‘शिवनेरी’ हा नवीन जिल्हा तयार करावा, अशी मागणी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा विभाजनाच्या मागणीचा एकत्रित विचार करावा लागेल, असे सांगितले होते. त्यानंतर अल्पावधीतच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यापद्धतीने संघटनात्मक बदल करताना उत्तर पुणे जिल्हा आणि दक्षिण पुणे जिल्हा असे दोन विभाग करण्याबाबत हालाचाली सुरू आहेत. त्यासाठी वेगवेगळे जिल्हाध्यक्ष करण्यात येणार आहेत. त्यामुळे आमदार लांडगे यांच्या जिल्हा विभाजनाच्या मागणीला बळ मिळाले आहे.
राष्ट्रवादीची कोंडी करण्याची तयारी…
पुणे जिल्ह्यातील २१ पैकी ११ विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाटीचे आमदार निवडून आले आहेत. कसबा मतदार संघात दोन महिन्यांपूर्वी पोटनिवडणूक झाली. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला यश मिळाले. त्यामुळे जिल्ह्यात भाजपाच्या आणि शिंदे गटाच्या तुलनेत महाविकास आघाडी आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद मोठी आहे. तसेच, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पुणे जिल्हा म्हणजे ‘होम पिच’ म्हणून ओळखला जातो. भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यात रोखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्याअनुशंगाने भारतीय जनता पार्टीकडून पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याच्या मागणीला साथ दिली जाईल आणि राष्ट्रवादीची कोंडी केली जाईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात लोकं जेवणावर तुटून पडली, अन्नाची प्रचंड नासाडी”
हेही वाचा…“जनतेच्या पैशातून भाजप-शिवसेनेचा प्रचार”, काॅंग्रेसची सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…नव्या संसद भवनाचा जंगी कार्यक्रम होणार, कार्यक्रम पत्रिका जाहीर, मोदींसह देशातील अनेक जण उपस्थित
हेही वाचा…ईडीची वक्रदृष्टी आता काॅंग्रेसच्या नेत्यावर, राज्यातील काॅंग्रेसच्या एकमेव खासदाराच्या मेव्हण्याला ईडीने घेरलं
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात पहिली वादाची ठिणगी.. आम्हाला सापत्न वागणुक मिळते, खासदारांचा हल्लाबोल