IMPIMP
Did Fadnavis decide to save only 40 people, Sushma Andahar's sharp question on 'that' case Did Fadnavis decide to save only 40 people, Sushma Andahar's sharp question on 'that' case

“तानाजी सावंतजी..! नाकाने वांग सोलू नका, हा फक्त ट्रेलर”,अन् सुषमा अंधारे सावतांवर कडाडल्या

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या कथित विनयभंग प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाली आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावेळी सुषमा अंधारे तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे समोर व्यक्ति नसल्याने विनयभंग होत नाही, असा निष्कर्ष देण्यात आला आहे. तर महिला आयोगाने याबाबत अहवाल प्राप्त न झाल्याचं सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा…“माझ्याविरोधातला एक आरोप जरी सिद्ध झाला, तर त्या दिवशी मी स्वत: फाशी घेईन”, बृजभुषण शरण सिंह 

क्लीनचिट मिळाल्याचं स्वत: आरोपी कसं सांगू शकतो? ही बाब सगळ्यात आधी तपास अधिकाऱ्यांनी सांगायला हवी. महत्वाचं म्हणजे हा अहवाल त्यांनी महिला आयोगाकडे सादर करायला हवा. पण तो महिला आयोगाकडे आलाच नाही. मग आधीच तो लीक कसा झाला? मला माहिती नाही याबाबत काही. यात फिर्यादीचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. मला का बोलावलं नाही. मला बोलावलं असं त्यांचं म्हणणं असेल, तर कसं बोलावलं. ? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा…“आजपासून अहमदनगरचं नाव….”, एकनाथ शिंदे अन् फडणवीसांनी चौंडीत केली मोठी घोषणा 

मला काहीही न विचारता एकांगी निर्णय का घेतला. हेच कराचं होतं, तर चौकशीचं नाटक का केलं? फडणवीसांचं असं काही ठरलंय का की ज्या ४० लोकांच्या पाठिंब्यावर त्यांचं सरकार चालू आहे, अशा लोकांना काहीही करून वाचवायचंचं असं ठरलंय का? फडणवीसांनी काय ती उत्तरं द्यायला पाहिजे. असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. तानाजी सावंतजी नाकाने वांग सोलू नका. हा फक्त ट्रेलर आहे. मी माझी लढाी चालूच ठेवणार आहे. प्रसंगी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन लढाई चालू ठेवणार. गेली ८ ते १० दिवस ब्रेक घेतला होता. त्यामुळं या दिवसात काय घडलं ते माहिती नाही. तानाजी सावंतावर नंतर सविस्तर बोलीन. असंही त्या म्हणाल्या.

READ ALSO :

हेही वाचा…शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोल्हेंचा पत्ता कट ? राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चाचपणी 

हेही वाचा…वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप अन् संत पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत होणार सोहळा

हेही वाचा…राष्ट्रवादीत चाललंय काय? लोकसभेच्या आढावा बैठकीत ‘या’ नेत्यांनी फिरवली पाठ

हेही वाचा…कुस्तीपट्टूंच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी, भाजपच्या ‘या’ खासदाराचा सरकारला घरचा आहेर 

हेही वाचा…बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याची राज ठाकरेंची मोदींकडे मागणी.. थेट पत्रच लिहिलं