चंद्रपुर : आयोध्यात भव्य राम मंदिर उभारलं जात आहे. पुढच्या वर्षी राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. यातच आता राम मंदिरासाठी चंद्रपुरमधील सागवानी लाकडं निवडण्यात आली आहे. यावरून संजय राऊतांनी त्यावर टिका केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते केशव उपाध्यय यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…हिंदू शेरनी..! भगवं उपरणं, काळा ड्रेस, अन् बुलेटवर स्वारी, नवनीत राणांचा हटके व्हिडीओ
अयोध्येमध्ये जे भव्य श्रीराम मंदीर उभारण्यात येत आहे त्यासाठी चंद्रपुरमधील सागवानी लाकडं निवडण्यात आली आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यासाठी जनता आनंद व्यक्त करतेय पण मंदीरासाठी लाकूड जात आहे म्हणून आता संजय राऊत यांना दुःख होत आहे, पोटशुळ उठला आहे? आम्ही म्हणतच नाहीये की अयोध्येला जाणारं लाकूड भाजपच्या मालकीचं आहे. ही सगळी महाराष्ट्राचीच संपत्ती आहे जी प्रभू श्रीरामाच्या मंदिराला भव्यदिव्य करणार आहे. हिंदुत्व सोडल आहे आता राम नवमी दिवशी तरी राम नाम घ्या . असा टोला केशव उपाध्यय यांनी राऊतांना लगावला आहे.
हेही वाचा… पुण्याच्या आघाडीच्या तीन आमदारांनी घेतली उच्च न्यायालयात धाव, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात याचिका दाखल
दरम्यान, आज संपुर्ण देशात राम नवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नाशिकसह पुणे मुंबईत लोकं आनंदात साजरा करीत आहेत. यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत राम नवमीच्या सणानिमित्ते गेले आहेत.
अयोध्येमध्ये जे भव्य श्रीराम मंदीर उभारण्यात येत आहे त्यासाठी चंद्रपुरमधील सागवानी लाकडं निवडण्यात आली आहे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यासाठी जनता आनंद व्यक्त करतेय पण मंदीरासाठी लाकूड जात आहे म्हणून आता @rautsanjay61 यांना दुःख होत आहे, पोटशुळ उठला आहे? आम्ही म्हणतच…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 30, 2023
Read also
हेही वाचा…संभाजीनगर राडा प्रकरण..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, ४०० जणांवर गुन्हा दाखल, CCTV फुटेज आलं समोर
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची प्राथमिकता महाविकास आघाडीला”, जयंत पाटील
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार नपुंसक,” न्यायालयाची टिप्पणी, अजित पवार सरकारवर भडकले, म्हणाले, “आत्मपरिक्षण करा…”