IMPIMP
Is a big political dal cooking in the state Who with whom So who against whom Is a big political dal cooking in the state Who with whom So who against whom

राज्यात मोठी राजकीय डाळ शिजतेयं? कोण कोणासोबत? तर कोण कोणाच्या विरोधात ?

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीत एकत्र आले नाही तर महाविकास आघाडी म्हणून लढवणार असा विचार केला जात आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर काॅंग्रेस आणि ठाकरे गट नाराज असल्याचंही सांगण्यात येत आहे. शरद पवारांच्या भेटीमुळे संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. एकीकडी इंडियाची बैठक होत असतांना दुसरीकडे शरद पवार भेटीगाठी घेत असल्याने महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे. त्यामुळे शरद पवारांना वगळून निवडणुका लढवण्याचा विचार महाविकास आघाडीत दिसून येत आहे.

हेही वाचा…“पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर,” काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा 

भाजपच्याविरोधात जो कुणी लढेल, त्याला सोबत घेऊन चालण्याची भूमिका काॅंग्रेसची आहे. त्यामुळे जो काही प्लॅन पुढे येत आहे. त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे भाजपच्याविरोधात जो लढेल, त्याला सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना विचारलं पाहिजे की, शरद पवारांना सोडून काही तयारी करायची का? उद्धव ठाकरेंचा निर्णय संजय राऊत घेत असतात. त्यामुळे संजय राऊतांना सोडूनच उद्धव ठाकरे नाना पटोले यांना भेटले, असा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरेंना लगावला.

हेही वाचा…शरद पवारांच्या भेटीची तक्रार काॅंग्रेसच्या हायकमांडकडे, राहुल गांधी चर्चा शरद पवारांसोबत चर्चा करणार 

दरम्यान, ३६ जण एकत्र येऊन काही फरक पडला नाही तर काॅंग्रेस आणि पवारसाहेब एकत्र येऊन काय फरक पडणार आहे. ? असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. यातच शरद पवारांना वगळून आगामी लोकसभा निवडणुका एकत्र  लढवू असा विचार काॅंग्रेस आणि ठाकरे गटात केला जात आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यात चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“सरकारमध्ये अस्वस्थता.., मुख्यमंत्र्यांने ठेवलं स्नेहभोजन, ‘या’ मंत्र्यांना दिलं आमंत्रण” 

हेही वाचा…“वॉशिंग मशीनच्या विरोधात आपल्याला लढायचं, घाबरण्याचं नाही”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला 

हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये धुसफूस आजी माजी आमदारांना कोणी विचारेना, पटोलें विरोधात नाराजीचा सूर 

हेही वाचा…“अरे वेड्या त्या गाडीत नव्हतोच, तर उतरणार कसा ?”, अजित पवारांनी ‘तो’ दावा फेटाळला 

हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा, शिंदेंनी ‘दोन’ उपमुख्यमंत्र्यांपासून सावध राहावं”