नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे ३१ मार्च २०२२ पर्यंत एकूण थकीत कर्ज सुमारे ३.४९ लाख कोटी आहे. याबाबतची माहिती बुधवारी संसदेत देण्यात आली आहे. त्यानंतर आता या कर्जाची परतफेड करण्यासाठी NHAL कडे रूपये आहे असं रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितलं आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर एक ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहण्यांपैकी, त्यांना सत्तेची लालसा”
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांमध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी NHAL कडे अनुक्रमे ३१, २८२ कोटी, ३१, ९०९, आणि ३०, ५५२ कोटी रूपये आहेत. अशी माहिती रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“शरद पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष पुढे नेईल, असा ‘वारसदार’ निर्माण करण्यात अपयशी”
सरकारने आणखी कर्ज द्यायला असमर्थ आहे. असं सांगितल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते विकायला काढलेत, अशी खबर आहे. २०१४ साली २४, ००० कोटी रूपये कर्ज होतं. आता ते ३.४८ लाख कोटी रूपये झालं आहे. टोलधाडी आता वाढतील. संपण्याची शक्यता नाहीच. उधारीवर ताज महल घ्यायला मला पण आवडेल असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! “संजय राऊत १० जुनपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार”
दरम्यान, यावर नितीन गडकरी म्हणाले की, केंद्राने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नुसार आर्थिक वर्ष २०२१-२२ ते २०२४-२५ या चार वर्षात एकूण ६ लाख कोटी रूपयांच्या मालमत्ता मुद्रीकरण योजनेत सर्वाधिक १.६ लाख कोटी रूपयांचा वाटा आहे. ऑपरेशलन हायवेची योजना संबंधित आहे.
सरकारने आणखी कर्ज द्यायला असमर्थ आहे असं सांगितल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते विकायला काढलेत अशी खबर आहे. २०१४ साली २४,००० कोटी रुपये कर्ज होतं. आता ते ३.४८ लाख कोटी रुपये झालंय.
टोलधाडी आता वढतील. संपण्याची शक्यता नाहीच!
उधारीवर ताज महल घ्यायला मला पण आवडेल
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार घटना बदलून अध्यक्ष झालेत, मग ते दुसऱ्याला अध्यक्ष कसे होऊ देतील ?” भाजपची टिका
हेही वाचा…“तेव्हा शाळेतील मुलंही म्हणू लागले की ‘आ गए गद्दार’, ” शरद पवारांनी तो किस्सा सांगत शिंदेंवर साधला निशाणा
हेही वाचा…“राऊतांना दुसऱ्याच्या घरात घुसायची गरज काय ?” भुजबळांनी संजय राऊतांना झापलं
हेही वाचा…“ठाकरेंना सांगूनही स्नेहल जगतापांना प्रवेश दिला”, नाना पटोलेंची टिका, आघाडीत बिघाडीची शक्यता ?
हेही वाचा…कोण पार्सल ते फडणवीसांना निपाणीत सांगणार ? फडणवीसांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर