नाशिक : महाराष्ट्रामध्ये विठ्ठलावरती तलवार चालवणे बापाचा घात करणे हे महाराष्टाच्या रक्तात नाही. एकीकडे बाप म्हणायचं, दुसरीकडे घाव घालायचा हे करू नका. असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टिका केली आहे. आज शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या बंडानंतर येवल्यात पहिली सभा होत आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.
हेही वाचा…“अजित पवारांमुळे आमचा त्रिशुळ तयार झाला, आता विनाश अटळ,” फडणवीसांचा विरोधकांना इशारा
कांदा पडला, द्राक्ष पडला, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं. त्यावेळी शरद पवार तुमच्यासोबत उभा राहिला. परंतु जेव्हा जेव्हा यांना गरज पडली. तेव्हा त्यांच्या तुम्ही घात केला. असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवारांना आता काहीही बनायचं नाही. त्यांना फक्त आता तुमच्यातील पोरांना आमदारा, खासदार बनवायचं आहे. महाराष्ट्राची फक्त माती ओळखतो. त्याचं नाव शरद पवार असंही आव्हाड म्हणाले.
हेही वाचा…अजित पवारांकडून मोदींचं कौतुक, शिंदे-फडणवीस-अजित पवार एकाच मंचावर
दरम्यान, शरद पवारांची आज येवल्यात सभा होत आहे. त्याआधी त्यांनी नाशिक येथील पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी आपल्या कामाची सुरूवात भटक्या- विमुक्त चळवळीतून केली. उपराकार लक्ष्मण माने हे साताराच्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्यासह सुप्रिया सुळेंही काम करू लागल्या. नंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षात करावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. मग सुप्रिया सुळे राज्यसभेत गेल्या. दोन वर्षांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताने सुप्रिया सुळे विजयी झाल्या. आता सुप्रिया सुळे यांची खासदारकीची तिसरी टर्म आहे. असं शरद पवारांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“येत्या दिवाळीपर्यंत आदित्य ठाकरे आर्थर रोड जेलमध्ये जाणार,” भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…भाजपच्या २ मंत्र्यांना डच्चू, अजित पवार, एकनाथ शिंदेंच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार ?
हेही वाचा…“दहा वर्ष केंद्रात मंत्रिपद, तरीही..,” शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांवर जोरदार टिका
हेही वाचा…“न टायर्ड हूं, न रिटायर्ड मैं तो फायर हूं”, शरद पवारांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…तुरूंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांना मंत्रिपद दिलं, अडचणीच्या काळात मदत केली, वाईट वाटतं.? शरद पवारांनी असं उत्तर दिलं की..