मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधत आहेत. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली की, त्याला प्रत्युत्तर म्हणून नितेश राणे पत्रकार परिषद घेत आहेत. यातच आता नितेश राणे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे लवकरच तुरूंगात जाणार असल्याचं विधान केलं आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…अजित पवारांकडून मोदींचं कौतुक, शिंदे-फडणवीस-अजित पवार एकाच मंचावर
सामानाच्या आजच्या अग्रलेखात संतपरंपरेवर लिहिण्यात आलं आहे. नाईट लाईफचे संत नेमके कोण आहेत, यावरही आता सामनाच्या अग्रलेखातून माहिती दिली पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरापालिकेतील भ्रष्टाचारासंदर्भात काही धाडी पडल्या आहेत.
हेही वाचा…““हवं तर राजकारण सोडून देतो, पण तुम्ही राष्ट्रवादीत परत या,” आव्हाडांची अजित पवारांना भावनिक साद”
रोमवेल बिल्डर असेल, हायवे कन्स्ट्रक्शन असेल, राहुल गोम्स असेल, हे नेमके कोण आहेत. कोणासाठी भ्रष्टाचार केला आहे. कोणाच्या माध्यमातून पैसे खाल्ले आहेत. याबाबतची माहिती दिली पाहिजे. अशी मागणी करताच येत्या दिवाळीपर्यंत आदित्य ठाकरे हे आर्थर रोड जेलमध्ये नाईट लाईफ साजरी करतील असं नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या २ मंत्र्यांना डच्चू, अजित पवार, एकनाथ शिंदेंच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार ?
हेही वाचा…“दहा वर्ष केंद्रात मंत्रिपद, तरीही..,” शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांवर जोरदार टिका
हेही वाचा…“न टायर्ड हूं, न रिटायर्ड मैं तो फायर हूं”, शरद पवारांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…तुरूंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांना मंत्रिपद दिलं, अडचणीच्या काळात मदत केली, वाईट वाटतं.? शरद पवारांनी असं उत्तर दिलं की..
हेही वाचा…“अजित पवारांमुळे आमचा त्रिशुळ तयार झाला, आता विनाश अटळ,” फडणवीसांचा विरोधकांना इशारा