मुंबई : येत्या १० मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. २२४ जागांसाठी घोषित निवडणुकीसाठी भाजप, काॅंग्रेसमध्ये प्रमुख लढत असून या निवडणुकासाठी महाराष्ट्र एकिकरण समीतीने देखील आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. याच पार्श्भूमीवर मराठी भाषिक मतदारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडणुन देण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा…“ठाकरेंना सांगूनही स्नेहल जगतापांना प्रवेश दिला”, नाना पटोलेंची टिका, आघाडीत बिघाडीची शक्यता ?
राज ठाकरे यांनी ट्विट करत मतदारांना आवाहन केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत. तुम्ही ज्या राज्याचे आहात,त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या मताचा मी ठाण आहे. त्यामुळे तुम्ही देखील मराठी उमेदवारांना विजयी करा. असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…कोण पार्सल ते फडणवीसांना निपाणीत सांगणार ? फडणवीसांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत, पण तरीही तिथलं सरकार जर मराठई माणसांना त्रास देणार असेल, तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही. मध्यंतरी जेव्हा पुन्हा एकदा सीमावादाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्र मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहण्यांपैकी, त्यांना सत्तेची लालसा”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, दोन राज्यातील बंध हा मजबुत आहे. तेव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे, त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो ज्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत. ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) May 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“वरती यशवंत चव्हाण साहेब देखील राज्याची राजकीय परिस्थिती पाहून रडत असतील”, अजित पवार
हेही वाचा…“उधारीवर ताज महल घ्यायला मला पण आवडेल”, म्हणून आव्हाडांनी सरकारवर केली टिका
हेही वाचा…“शरद पवार घटना बदलून अध्यक्ष झालेत, मग ते दुसऱ्याला अध्यक्ष कसे होऊ देतील ?” भाजपची टिका
हेही वाचा…“तेव्हा शाळेतील मुलंही म्हणू लागले की ‘आ गए गद्दार’, ” शरद पवारांनी तो किस्सा सांगत शिंदेंवर साधला निशाणा
हेही वाचा…“राऊतांना दुसऱ्याच्या घरात घुसायची गरज काय ?” भुजबळांनी संजय राऊतांना झापलं