मुंबई : देशात अनेक डायरीवरून चित्रपट बनविले जात आहेत. द केरला स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक अग्निहोत्री यांना एक स्टोरी देणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात एव्हाना देशात लवकरच ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ हा चित्रपट येणार असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी शिंद गटातील नेत्यांवर टीका करीत कडाडून हल्लाबोलही केला. त्यावर आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…ईडीची वक्रदृष्टी आता काॅंग्रेसच्या नेत्यावर, राज्यातील काॅंग्रेसच्या एकमेव खासदाराच्या मेव्हण्याला ईडीने घेरलं
दरम्यान, शिंदे गटाला मी पक्ष मानत नाही, हा एक कोंबड्यांचा खुराडा आहे. फडफड करीत आहे सध्या, त्या कोंबड्यांच्या मानेवर कधीही सुरू फिरवली जाईल. यातच त्यांना लोकसभेत २२ नाही तर पाच ही जागा मिळणार नाही. अशी टिकाही त्यांनी केली आहे.
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात पहिली वादाची ठिणगी.. आम्हाला सापत्न वागणुक मिळते, खासदारांचा हल्लाबोल
शिंदे गटाला पक्ष मानत नाही, हा एक कोंडब्यांच्या खुराडा आहे. फडफड करीत आहे, सध्या त्या कोंबड्यांच्या मानेवर कधीही सुरू फिरवली जाईल. अशी टिका राऊतांनी केली आहे. त्यावर शिरसाठ म्हणाले की, संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा आहे. त्याला रोज काही ना काही बडबड कुणालाही नांदू द्यायचं नाही, असा त्याचा चंग असतो. खरंतर त्याने आज जे स्टेटमेंट केलं आहे. आम्हाला कोंबड्यांचा खुराडा वगैरे जे म्हणाला आहे. त्याने रमजानमध्ये शीरखुर्मा जास्त खाल्ल्याने त्याच्यावर कापायचा प्रभाव पडला आहे. ज्याची नसबंदी झालेली असते. त्याला मुलं होत नाही म्हणतात. पण संजय राऊत हा असा चमत्कार आहे. जो नसबंदी झाल्यावरही आम्हाला मुलं होतील असं सांगतो आहे. असंही शिरसाठ म्हणाले.
हेही वाचा…पटोलेंविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या वडेट्टीवारांचा दिल्ली खुलासा, म्हणाले, की आमच्यात…
पुढे बोलतांना ते म्हणाले की, संजय राऊत हा सैराट सारखा पिक्चर काढणार असून राष्ट्रवादी आणि त्यांचे जे प्रेम संबंध चालू आहे. त्याचा अंत सुसाईडमध्ये होणार आणि तो सुसाईड केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर त्यांनी पिक्चर काढले पाहिजे होते. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदेंच्या सभेसाठी अधिकाऱ्यांना ५० हजार, १२ हजार, ६ हजार देण्याचे आदेश”, ठाकरे गटाच्या नेत्यांचा गंभीर आरोप
हेही वाचा…पुणे जिल्हा विभाजनाच्या मागणीला भाजपाचे संघटनात्मक ‘बळ’, संघटनात्मक बदलांमध्ये दोन विभाग : जिल्ह्याला दोन अध्यक्षपदाची निर्मिती?
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात लोकं जेवणावर तुटून पडली, अन्नाची प्रचंड नासाडी”
हेही वाचा…“जनतेच्या पैशातून भाजप-शिवसेनेचा प्रचार”, काॅंग्रेसची सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…नव्या संसद भवनाचा जंगी कार्यक्रम होणार, कार्यक्रम पत्रिका जाहीर, मोदींसह देशातील अनेक जण उपस्थित