पुणे : मागील काही दिवसापासून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्य अन् त्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्याविरोधात घेतलेली भूमिका राज्याच्या राजकारणात चर्चेची ठरली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. यातच आता पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यानी सुषमा अंधारे यांच्यावर टिका केली.
हेही वाचा…“उद्धव ठाकरे तुम्हाला फडतूस म्हणतायत, तुम्ही जर खरचं काडतूस आहात, तर मग एखादी गोळी चालवून दाखवा”, मनसेनचं आवाहन
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची तुलना राखी सावंत हिच्याशी केली आहे. तसेच सनसनाटी वाढवण्यामध्ये या दोघींची सध्या स्पर्धा लागली आहे. असंही मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सुषमा ताई तोप बनने के लिए फौलाद का कलेजा चाहिए सुरज पश्चिम से भी उग गया तब भी फुसगी बम तोफ नहीं बन सकता. असं म्हणत मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टिका केली आहे.
हेही वाचा..रोशनी शिंदे प्रकरण..! महिला आयोगाने थेट पोलिसांना पाठविली नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश
मोहित कंबोज यांनी ट्विट करून सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे आणि राखी सावंत ह्या दोन्ही बहिणी आहेत. एक बहिण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहिण महाराष्ट्राच्या सिनेमात आहे. दोन्ही जास्त सनसनाटी कोण निर्माण करणार यामध्ये स्पर्धा लागली आहे. असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
सुषमा ताई , तोप बनने के लिए फ़ौलाद का कलेजा चाहिये। सूरज पश्चिम से भी उग गया तब भी फुसकी बम तोप नहीं बन सकता !
जय श्री राम !
— Mohit Kamboj Bharatiya – #IAmSavarkar (@mohitbharatiya_) April 7, 2023
Read also
हेही वाचा…““राजकीय नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात,” प्रेमात धोका मिळाल्याने नेत्यांकडून खंडणी मागत होता
हेही वाचा..शिरुर लोकसभेत भाजपा सुसाट, महाविकास आघाडी ‘कोमात’
हेही वाचा…“घोटाळेबाज, भ्रष्टाचारी लोकांची चौकशी तर दुरच त्यांच्याशी मैत्री करून संरक्षण दिले जाते”, काॅंग्रेसची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…“वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज”, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दणका..! उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका