IMPIMP
Will old pension be applied to striking employees, will Shinde announce in the hall? Employees present at work from tomorrow Will old pension be applied to striking employees, will Shinde announce in the hall? Employees present at work from tomorrow

संपकरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू, शिंदे सभागृहात घोषणा करणार? उद्यापासून कर्मचारी कामावर हजर

मुंबई :  जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, महापालिका, शिक्षक संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत संपाला सुरूवात केल्यावर जनतेचे हाल सुरू झाले. त्यानंतर जवळपास सात दिवस संप चालु असल्याने  बहुतांश शासकीय सेवा ठप्प झाल्या. काही महापालिकांमध्ये अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कामकाज सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरु असले तरी जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अनुदानित शाळा-महाविद्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आणि अनेक शासकीय रुग्णालयांमधील आंतररुग्ण सेवेचाही बोजवारा उडाला. यातच आता राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा…रामदास कदमांना ‘बाम्ब लाव्या’, ‘तात्या विंचू’ म्हणत होतो, पण आता त्यांना ‘कोकणातील जोकर’ अशी नवी उपमा,” भास्कर जाधव 

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, असा दावा काटकर यांनी केला. तसे लेखी आश्वासन सरकारने दिल्याचंही काटकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री यासंदर्भातील निवेदन विधानसभेत करतील. संप मिटल्याने उद्यापासून कर्मचारी कामावर हजर राहतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा…“सनातन धर्म आम्ही स्विकारणार नाही, त्याचा आम्ही टोकाचा विरोध करु” जितेंद्र आव्हाडांनी मांडली आपली भूमिका

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील संपाचा मुद्दा चांगलाच गाजला. यातच राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतीचं पंचनामे करण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध न झाल्याने सरकारचीही अवस्था दयनीय झाली. तर काही रूग्णालयात कंत्राटी पद्धतीने कर्माचाऱ्यांना संपाच्या वेळी घ्यावं लागलं. त्यामुळे राज्यातील सगळ्या कारभाराचा चांगलाचं बोजावाजा उडाला.

Read also