अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यामुळे एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्व कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी विविध पक्षात काम केलं असून केंद्रात तसेच राज्यात अनेक मंत्रीपद भुषवली आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा…“पक्ष फुटीचा काॅंग्रेसला मोठा फायदा,” राष्ट्रवादी, मनसे आणि वंचितच्या ‘या’ नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश
माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांचे दु:खद निधन झाल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. गोवा मुक्तिसंग्रमातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरूवात करीत त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील एका मोठ्या व्यक्तीमत्वास आपण मुकलो आहोत. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो तसेच त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…शरद पवारांच्या ‘या’ एकनिष्ठ कार्यकर्त्याने साथ सोडली, शिवबंधन बांधून ठाकरे गटात केला प्रवेश
ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाची वार्ता राजकीय क्षेत्रात सर्वांसाठी दुःखदायक आहे. ढाकणे कुटूंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली होती. बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले. संघर्षशील, सर्वसामान्यांचे प्रामाणिक नेतृत्व बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..! असं शरद पवारांनी म्हटलंय.
अहमदनगर येथील अकोला येथे १० नोव्हेंबरला त्यांचा जन्म झाला होता. १९७८ मध्ये बबनराव ढाकणे यांनी विधानसभेची निवडणुक लढवली आणि त्यात ते विजयी झाले होते. त्याच वर्षी त्यांना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर १९७९ मध्ये त्यांनी ग्रामविकासमंत्री पदाचीही शपथ घेतली.
हेही वाचा…“जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका,” आणखी एका मराठा तरूणाने संपवलं जीवन
पुढे १९७९ ते १९८१ मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तर १९८१ मध्ये राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर १९८५ मध्ये पुन्हा आमदार म्हणून त्यांची निवड झाली. तर १९८८ मध्ये विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर १९८९ बीड लोकसभा निवडणुक लढवून त्यांची केंद्रात वर्णी लागली. केंद्रात त्यांना १९९० मध्ये राज्यमंत्री पद देण्यात आले होते.
जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काॅंग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी काॅंग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले होते. यासोबत उस तोडणी कामगरा, शेतकरी, बेरोजगारी अशा विविध विषयांना त्यांनी हात घातला होता. दिवंगत ढाकणे यांचा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंत चव्हाण,वसंतराव नाईक, व्ही.पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा त्यांना सहवास लाभला. माझी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळाही त्यांनी पार्थडीत उभा केला. ढाकणे यांच्या मागे मुलगा प्रतापराव ढाकणे, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांचे दुःखद निधन झाल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. गोवा मुक्तिसंग्रामातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. विद्यार्थी चळवळीतून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीस सुरुवात करीत त्यांनी राज्याच्या व देशाच्या राजकारणात आपले वेगळे स्थान… pic.twitter.com/Ren2Y3L2XT
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला झोपू देणार नाही”, मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा
हेही वाचा…“ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारेंनी दिला मोठा पुरावा,” कारवाई करण्याची केली फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…“तीच लोकं आज बघ्याच्या भूमिकेत गप्प राहिली, दुख वाटलं”, शरद पवारांच्या टिकेनंतर आव्हाडांचा अजित पवारांना टोला
हेही वाचा…माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
हेही वाचा…मोठी बातमी..! १७ हजार कोटींचा डायमंट मार्केट मुंबईतून गेला सुरतला, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदेंवर केली जोरदार टिका